शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Video : संतापजनक! तरुणीच्या गाडीला धडक, रिक्षाचालकाने पोलिसाच्याही लगावली कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 12:27 IST

Ulhasnagar Viral Video : मद्यधुंद रिक्षाचालकाने एका तरुणीच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर तिच्यासोबत वाद घातला. इतकेच नाही, तर चक्क वाहतूक पोलिसालाही बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Ulhasnagar News : पोलिसांचा धाक राहिलाय की नाही? असा प्रश्न हा व्हिडीओ बघून पडू शकतो. आधी मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवला. तरुणीच्या गाडीला धडक दिली आणि नंतर पोलीस ठाण्यात घेऊन जाणाऱ्या पोलिसाच्याच रिक्षाचालकाने कानशि‍लात लगावली. इतकेच नाही, तर त्याला बेदम मारहाण केली. हा संतापजनक प्रकार घडला आहे उल्हासनगरमध्ये. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, मुजोर रिक्षाचालक कशा पद्धतीने मारहाण करत आहे, हे सगळे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकांची मारहाण, नक्की काय घडले?

उल्हासनगरमधील कॅम्प नं ३ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पूलावर ही घटना घडली. शुक्रवारी (६ सप्टेंबर) दुपारी तीन वाजता खड्डे भरण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यावेळी एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकाने तरुणीच्या दुचाकीला धडक दिली. 

धडक दिल्यानंतर रिक्षाचालकाने तरुणीसोबत वाद घालायला सुरूवात केली. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी गेले. त्यांनी त्याला जाब विचारला. रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला पोलीस ठाण्यात चालण्यास पाटील यांनी सांगताच रिक्षाचालकाने त्यांच्या कानशि‍लात लगावली. 

वाहतूक पोलिसावर दोन-तीन रिक्षाचालकांचा हल्ला 

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकाने वाहतूक पोलीस मोहन पाटील यांना कानाखाली मारल्यानंतर पाठीमागून दुसऱ्या रिक्षाचालकाने त्यांना थापड मारली. त्यानंतर रिक्षाचालकाने त्यांच्यावर बाटलीतील पाणी फेकले, तर दुसऱ्या रिक्षाचालकाने पाटील यांना मागे खेचले. तोल जाऊन ते रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडले. 

फरार रिक्षाचालकाला अटक

काही लोकांनी रिक्षाचालकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, दोघेही वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून गेले आणि मारहाण केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात एका व्यक्तीने टिपला. घटनेनंतर रिक्षाचालक फरार झाले. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून या रिक्षाचालकाला अटक केली असून, त्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसthaneठाणे