उल्हासनगर सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:34+5:302021-03-21T04:39:34+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-५ गांधी रोड रस्त्यावर भारत लालवानी यांच्या कृष्णा मेडिकल या औषधांच्या दुकानाचे शटर शुक्रवारी रात्री अनोळखी ...

उल्हासनगर सारांश बातम्या
उल्हासनगर : कॅम्प नं-५ गांधी रोड रस्त्यावर भारत लालवानी यांच्या कृष्णा मेडिकल या औषधांच्या दुकानाचे शटर शुक्रवारी रात्री अनोळखी चोरट्यांनी तोडून टेबलच्या दोन ड्रॉव्हरमधून ३३ हजाराची रोख रक्कम चोरून नेली. हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------
‘हॅण्डवॉश, थर्मल स्कॅनिंग पुन्हा सुरू करा’
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर केले जाणारे हॅण्डवॉश व थर्मल स्कॅनिंग कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बंद झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ते पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
------------------
व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
उल्हासनगर : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने व्यापाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन यूटीए व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छटलानी यांनी केले, तसेच कोरोना लसीकरणासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
-----------------------
वाचली