शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

उल्हासनगरमध्ये पुतळे बेवारस,पालिकेचे दुर्लक्ष : स्वच्छतेचा पत्ताच नाही, अवहेलना थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 1:58 AM

महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे.

उल्हासनगर : महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे. याविरोधात माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी आवाज उठवून पुतळयाची अवहेलना थांबवण्याची विनंती केली आहे.महापालिकेने शहरातील मुख्य चौक, मुख्य रस्ते, उघानांमध्ये २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. त्यांची निगा व पावित्र्य राखण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे. आठवडयातून एकदा पुतळयाची पाण्याने साफसफाई करून रोज फुलांचा हार अर्पण करण्याचे काम यापूर्वी बांधकाम विभागाकडून करण्यात येत होते. ते आजही केले जात असल्याचा दावा विभागाने केला असला तरी, त्यांचा खोटारडेपणा मालवणकर यांनी उघड केला आहे. मालवणकर यांनी काही दिवसांपूर्वी हिराघाट येथील सरदार वल्लभभाई पटेल व जयप्रकाश नारायण यांचा पुतळा धुळीने माखलेला असल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकून एकच खळबळ उडवून दिली होती.मालवणकर यांनी टाकलेल्या फोटोनंतर महापालिकेने शहरातील पुतळयांची स्वच्छता करून हार अर्पण केले. मात्र त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीचा प्रत्यय आला. पुतळे पुन्हा धुळीने माखले असून हार उन्हामुळे पूर्णत: वाळल्याचे फोटो मालवणकर यांनी सोशल मीडियावर टाकले. ७०० कोटीचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेला राष्ट्रपुरूष, संत व सुधारकांच्या पुतळयाची निगा व पावित्र्य राखता येत नसल्याचे पुन्हा उघड केले. पुतळ््यांची महापालिकेकडून होणारी अवहेलना थांबत नसल्याने, सामान्य नागरिकांकडून पालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त होत आहे.महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, वीर सावरकर, जिजामाता व बालशिवाजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहाद्दूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, रवींद्रनाथ टागोर, संत कंवाराम, स्वामी शांतीप्रकाश, शहीद हेमू कलानी, स्वामी दयानंद स्वरस्वती आदी २२ पुतळे बसवले आहेत. कंत्राटदारामार्फत हे काम करत असून त्यावर लाखोंचा खर्च दाखवला जातो.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर