उल्हासनगर : नेताजी चौकात जुगार अड्डा पोलीस धाडीत एकाला रोख रक्कमेसह अटक
By सदानंद नाईक | Updated: April 15, 2024 15:08 IST2024-04-15T15:07:39+5:302024-04-15T15:08:02+5:30
धाडीत एका इसमाला रोख रक्कमेसह अटक केली असून इमारतीच्या वरच्या मजल्यावर कॉलेज आहे.

उल्हासनगर : नेताजी चौकात जुगार अड्डा पोलीस धाडीत एकाला रोख रक्कमेसह अटक
उल्हासनगर : नेताजी चौकातील साई ऑर्केड इमारतीच्या गाळ्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री धाड टाकली. धाडीत एका इसमाला रोख रक्कमेसह अटक केली असून इमारतीच्या वरच्या मजल्यावर कॉलेज आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, नेताजी चौकात साई ऑर्केट नावाची इमारत असून इमारतीच्या वरच्या मजल्यावर कॉलेज आहे. इमारतीच्या गाळा नं-८ व ८ (अ) मध्ये विविध प्रकारचे जुगार सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलिसांनी मिळाल्यावर, त्यांनी शनिवारी रात्री धाड टाकली. रात्री साडे आठ ते साडे बारा वाजे पर्यंत पोलिसांची झाडाझडती सुरू होती.
जुगाराच्या साहित्यासह १ लाख ७४ हजार ९१० रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी सुनील गिरधारीलाल खूबचंदानी याला अटक करून गुन्हा दाखल केला. ज्या इमारती मध्ये कॉलेज वर्ग सुरू आहे. त्याच इमारतीच्या काही गाळया मध्ये जुगार अड्डा सुरू असल्याचे उघड झाल्यावर, मुलांच्या पालकांत धडकी भरल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस अधिक तपास करीत आहेत. शहरातील बहुतांश चौक परिसरात जुगार अड्ड्याला ऊत आला असून पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे