उल्हासनगर महापालिकेचा महापौर सिंधी, मराठी व शीख नागरिक हवा:राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री
By सदानंद नाईक | Updated: December 10, 2025 17:45 IST2025-12-10T17:45:25+5:302025-12-10T17:45:25+5:30
उत्तर भारतीय स्थानिक नेत्याकडून गंगोत्रीच्या वक्तव्याचा समाचार

उल्हासनगर महापालिकेचा महापौर सिंधी, मराठी व शीख नागरिक हवा:राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहराच्या विकासात योगदान देणारे सिंधी, मराठी व शीख नागरिकां पैकी कोणीतरी महापालिका महापौर बनावे. असे वक्तव्य स्थानिक न्यूज चॅनेलवर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहरजिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांनी केले. या वक्तव्याचा उत्तर भारतीय स्थानिक नेत्यांनी समाचार घेत पक्ष प्रमुख अजित पवारसह निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे संतोष पांडे यांनी म्हणाले.
उल्हासनगर महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर प्रत्येक पक्षात स्थानिकस्तरावर आयाराम-गयाराम यांचा प्रवेश सोहळा सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. दरम्यान महायुती होणार असल्याचा बातम्या धडकल्यावर भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी पक्षातील स्थानिक प्रस्थापित नेत्यांनी सुटकेचा श्वास टाकला. तर असंख्य इच्छुकांची कोंडी झाली. महापालिकेत प्रस्तापित नको अशी इच्छा सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांत बळावली असल्याने, सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यात मळगळ आली. या दरम्यान एका स्थानिक न्यूज चॅनेलवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहरजिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांनी मुलाखत देतांना महापालिकेचा महापौर सिंधी, मराठी व शीख यापैकी कोणीतरी व्हावे. असी टिपण्णी केली. भारत गंगोत्री यांच्या टिपण्णीने उत्तर भारतीय स्थानिक नेते यांनी एकत्र येत नाराजी व्यक्त केली. उत्तर भारतीय यांची शहर विकासात योगदान नाही का? असा प्रश्न विचारला.
गंगोत्री यांच्या या टिपण्णीने उत्तर भारतीयसह इतर समाजाचे मन दुखाविले असून पक्ष प्रमुख अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पांडे म्हणाले. निवडणूक आयोग यांच्यासह संबधिताकडे तक्रार करणार केली जाणार आहे. दरम्यान कोणत्याही समाजाचे मन दुखविण्याचा आपला हेतू नोव्हता, अशी प्रतिक्रिया भारत गंगोत्री यांनी दिली. शहरांत उत्तर भारतीयसह बिहारीं, गुजराती, साऊथ व बंगाली नागरिकांची संख्या मोठी आहे. आजपर्यंतच्या महापालिका इतिहासात महापौर व उपमहापौर पदी मराठी व सिंधी समाजाची वर्णी लागली आहे