शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

उल्हासनगर महापालिकेला हवा स्वत:चा पाणीस्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:33 IST

महापालिकेकडे स्वत:चे पाणीेस्रोत नसल्याने पाणीटंचाईची समस्या उभी ठाकली.

- सदानंद नाईकउल्हासनगराला स्वत:चा पाणीस्रोत नाही. एमआयडीसीकडून या शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याचे दर अन्य शहरांच्या तुलनेत अधिक आहेत. शहराला स्वत:च्या पाणीस्रोतांची आस लागली आहे.महापालिकेकडे स्वत:चे पाणीेस्रोत नसल्याने पाणीटंचाईची समस्या उभी ठाकली. एमआयडीसीचे उल्हास नदीवर असलेले पाणीपुरवठ्याचे पंपिंग स्टेशन हस्तांतरित करण्याची मागणी पालिकेने राज्य शासनाकडे केली असून शासनाने हिरवा कंदील दिल्यास, शहराची पाणीसमस्या सुटून कोट्यवधीची बचत होणार आहे. तसेच शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात पालिका यशस्वी होणार आहे.उल्हासनगर पालिकेकडे स्वत:चे पाणीस्रोत नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीच्या लहरीपणाचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होऊन अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहरात कायम पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. शहरवासीयांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना राबवली. मात्र, योजना अपयशी ठरली असून मुबलक पाण्याऐवजी दिवसाआड पुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्यानेच समस्या निर्माण झाल्याची टीका सर्वस्तरांतून होत आहे.राज्यात कोणत्याही शहराला एमआयडीसीद्वारे पाणीपुरवठा होत नाही. औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम एमआयडीसीचे असून पाण्याचा दर इतरांपेक्षा दामदुप्पट असतो. मात्र या सर्व प्रक्रियेला उल्हासनगर अपवाद आहे. शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. पालिका एमआयडीसीला पाणीबिलापोटी तब्बल ३२ कोटींपेक्षा जास्त निधी देते. महापालिकेचे क्षेत्र जेमतेम १३ किमी असून ९ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. शहराला दरदिवशी १४० एमएलडी पुरवठा होतो. पूर्वेला शहाड गावठाण तर पश्चिमला पाले-जांभूळ जलसाठ्यातून हे पाणी मिळते.मुख्य जलवाहिन्यांवर पाणीमीटर न बसवल्याने शहराला किती एमएलडी पाणीपुरवठा होतो, हे निश्चित सांगता येत नाही. एमआयडीसी सोडत असलेल्या दाबावर पाणीबिल पाठवले जाते. मात्र, शहराला पुरवठा झालेल्या पाण्यापेक्षा जास्त रकमेचे बिल पाठवल्याचे महापालिका सांगते. तर बिल बरोबर असल्याचे एमआयडीसीचे नेहमीचे म्हणणे आहे. या प्रकाराने महापालिकेवरील थकबाकी वाढत चालली असून एमआयडीसी जाणीवपूर्वक अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा करत असल्याचा आरोप महापालिकेसह सत्ताधारी व विरोधी पक्ष करत आहेत. मात्र ठोस निर्णय घेत नसल्याने, पालिका अद्यापही पाण्यासाठी परावलंबी आहे. वालधुनी व उल्हास नदी जात असून उल्हास नदीत पावसाळ्याव्यतिरिक्त आंध्र व बारवी धरणातून पाणी सोडल्याने नदी बारामाही वाहते.उल्हास नदीवर सेंच्युरी रेयॉन कंपनीजवळ एमआयडीसीने पम्पिंग स्टेशन बांधले. तेथील नदीपात्रातून थेट पाणी उचलून शहाड येथील साठवण टाकीत शुद्ध केले जाते. त्यानंतर उल्हासनगरसह इतर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदीला १२ महिन्यांपैकी सहा महिने पावसाचे वाहते पाणी असते. नदीचे वाहणारे पाणी खाडीत जाण्याऐवजी ते अडवून, पंपिंग स्टेशनद्वारे साठवण टाकीत आणल्यास, उल्हासनगरला स्वत:चे पाणीस्रोत तयार होणार आहे. मात्र अद्यापही महापालिकेने त्यादिशेने पावले उचलली नाही. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सेंच्युरी कंपनीशेजारील व उल्हास नदीवरील एमआयडीच्या पम्पिंग स्टेशनसह इतर यंत्रणा महापालिकेला हस्तांतर करा, अशी मागणी राज्य शासनाकडे केल्याने, पालिकेला स्वत:चा पाण्याचा स्रोत मिळाल्याचा आनंद सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाला झाला आहे.उल्हास नदीचे पाणी मोफतउल्हास नदीला पावसाळ्यात पूर येऊन पाणी खाडीद्वारे समुद्राला मिळते. पावसाळ्यात नदीतील सहा महिने महापालिकेला मोफत वापरता येणार आहे. इतर सहा महिने बारवी व आंध्र धरणातून वेळोवेळी पाणी नदीपात्रात सोडले जाते. तसेच राज्य शासनाच्या मध्यस्थीने नदीपात्रात गरजेनुसार पाणी धरणातून सोडल्यास, शहराची तहान भागणार आहे.महापालिकेची३२ कोटी बचतउल्हास नदीतील पाणी उचलून शहरवासीयांना पुरवठा केल्यास, एमआयडीसीला देण्यात येणाºया बिलापोटी वर्षाला ३२ कोटी रुपयांची बचत होणार आहे.शासनाकडे प्रस्ताव पाठवणारमहासभेने एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन पालिकेकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यास, महापालिका शासनाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे. उल्हास नदी शहराच्या हद्दीतून वाहत असून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशनही पालिकेच्या हद्दीत आहे. शहराच्या हद्दीतून वाहणाºया नदीचा उपयोग महापालिका का करीत नाही, असा प्रश्न शहरात विचारला जात आहे. पालिका अधिकारी असा प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीला लागले आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका