शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका मुकादम पोकलन मशिनच्या धक्क्याने गंभीर जखमी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 20:04 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५ इंदिरानगर गॅस गोडाऊन परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता पावसाळ्या पूर्वीचे नाले सफाईचे काम पोकलन मशिनद्वारे सुरू होते.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-५ परिसरात नालेसफाई सुरू असताना पोकलन मशीनचा धक्का लागून महापालिका मुकादम जखमी झाला. याप्रकरणी पोकलन चालका विरोधात उशिराने गुन्हा दाखल झाला असून कामगार संघटनेने पोखलन ठेकेदाराला दवाखान्यात येत असलेल्या खर्चाची मागणी केली. 

उल्हासनगर कॅम्प नं-५ इंदिरानगर गॅस गोडाऊन परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता पावसाळ्या पूर्वीचे नाले सफाईचे काम पोकलन मशिनद्वारे सुरू होते. त्यावेळी कामाची देखरेख करणारे महापालिका मुकादम संतोष दादू क्षेत्रे उपस्थित होते. पोकलन चालक त्येंबक ज्ञानदेव गाढवे यांनी पोकलन मशीन बंद करून मुकादम यांना नालीची भिंत पडते का बघा. असे सांगितले. मुकादम भिंत बघण्यासाठी फिरले असता, पोकलन चालकाने काही एक कल्पना न देता पोकलन मशीन सुरू केली.

मशीनचा जोरदार धक्का लागल्याने, छाती व बरगड्याला मार लागून फक्चर झाल्या. मुकादम संतोष क्षेत्रे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोकलन ठेकेदाराने रुग्णालयाचा सर्व खर्च करावा, अशी मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी केले. महापालिका आयुक्तांना अशा ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करून दवाखान्याचा खर्च ठेकेदाराने केला नाहीतर आंदोलनाचा इशारा साठे यांनी दिला. महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी सर्व प्रकारची चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर