शहरातील भुयारी गटार योजनेसाठी उल्हासनगर महापालिकेला १०० कोटीचे कर्ज, पहिला १८.७६ कोटींचा हप्ता
By सदानंद नाईक | Updated: April 1, 2025 18:10 IST2025-04-01T18:10:27+5:302025-04-01T18:10:38+5:30
शहरात ४२३ कोटीची भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँके अंतर्गत नागरी पायाभूत सुविधा विकास निधी म्हणून १०० कोटीच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली.

शहरातील भुयारी गटार योजनेसाठी उल्हासनगर महापालिकेला १०० कोटीचे कर्ज, पहिला १८.७६ कोटींचा हप्ता
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात ४२३ कोटीची भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँके अंतर्गत नागरी पायाभूत सुविधा विकास निधी म्हणून १०० कोटीच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली. त्यातील १८.७६ कोटींचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांनी दिली असून पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी याला दुजोरा दिला आहे.
उल्हासनगरात अमृत योजने अंतर्गत ४२३ कोटीची भुयारी गटार योजनेचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. या योजने अंतर्गत गटारीचे पाईप नव्याने टाकण्यात येत असून मलनि:सरण केंद्र उभारण्यात येत आहे. गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते जैसे थे दुरस्ती करावयाचे आहे. या योजने मध्ये केंद्र, राज्य व महापालिका यांचा प्रत्येकी ३३ टक्के निधीचा समावेश आहे. आजपर्यंत योजनेचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून ठेकेदाराला कामापोटी ९५ कोटी पेक्षा जास्त बिल अदा केले. असी माहिती पाणी पुरावठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी दिली.
महापालिकेची आर्थिकस्थिती डबघाईला आली असल्याने, योजनेतील स्वतःचा हिस्सा देण्यासाठी पैसा नाही. भुयारी गटार योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिकेने १०० कोटीच्या कर्जाची मागणी एनएचबी (राष्ट्रीय गृहनिर्माण बँक) यांच्याकडे केली होती. नागरी पायाभूत सुविधा विकास निधी (युआयडीसी) अंतर्गत १०० कोटींचे कर्ज मंजूर झाले. तसेच १८.७६ कोटींचा पहिला हप्ता लवकरकच मिळणार असल्याचे मुख्य लेखअधिकारी किरण भिल्लारे यांनी दिली. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी १०० कोटीचे कर्ज मंजूर झाल्याच्या वृताला कबुली दिली. तसेच ७ वर्षात कर्जाची परतफेड करावी लागणार असून व्याजदर कमी असल्याचे भिल्लारे यांचे म्हणणे आहे. योजनेचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून १०० टक्के काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न सर्वस्तरातून विचारला जात आहे.
गटारीचा पहिला टप्पा पूर्ण
भुयारी गटार योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या योजनेतून मुख्य मलनि:सारन वाहिण्या नव्याने टाकण्यात आले असून दोन मलनि:सारन केंद्राचे काम पूर्ण झाले. तार दुसऱ्या टप्यात शहर अंतर्गत गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरु आहे.