महाराष्ट्रातील महापालिकेमधून उल्हासनगर महापालिका आयुक्त प्रथम
By सदानंद नाईक | Updated: May 1, 2025 15:22 IST2025-05-01T15:22:22+5:302025-05-01T15:22:35+5:30
राज्य सरकारच्या १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अतंर्गत महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकेमधून सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून ८६.२९ गुणांसह उल्हासनगर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला.

महाराष्ट्रातील महापालिकेमधून उल्हासनगर महापालिका आयुक्त प्रथम
उल्हासनगर : राज्य सरकारच्या १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अतंर्गत महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकेमधून सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून ८६.२९ गुणांसह उल्हासनगर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला. तर महाराष्ट्रातील सर्व कार्यालयामधून ८६.२९ गुणासह दुसरा क्रमांक पटकांविल्याची माहिती आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती झाल्यावर, त्यांनी आपल्या कामाची चुनक दाखविली. शहरातील बेशिस्त कारभाराला आळा घालून स्मार्ट पार्किंग, स्मार्ट रस्ते, ऑनलाईन बांधकाम परवाने, नागरिकांच्या तक्रारीचे निवरण, कचरा मुक्त शहर, कार्यालयाचे संगणीकीकरण, कामाचे वाटप, भंगार साहित्य व गाड्याची विल्हेवाट, अवैध बांधकामावर अंकुश, पार्किंग झोन, संकेत स्थळावर अध्यावत माहिती शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणेची मोहीम उपक्रम अंतर्गत यशस्वीपणे राबविली. गुरुवारी सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते महापालिका प्रांगणात झेंडावंदन झाल्यानंतर महापालिकेने पटकाविलेल्या प्रथम क्रमांकाबाबत माहिती दिली.
महापालिका प्रांगणातील झेंडावंदनानंतर आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली. यावेळी आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते महापालिका समाज मंदिरे व्यवस्थापन प्रणाळी ऍपचे उदघाटन केले. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अतंर्गत सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे आयुक्त मनिषा आव्हाळे यांचा आमदार कुमार आयलानी यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी सत्कार करून, आयुक्ताचे तोंड गोड करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व कार्यालयामधून ८६.२९ गुणासह महापालिकेने दुसरा क्रमांक पटकवण्यात आल्याची माहिती आयुक्त आव्हाळे यांनी दिली.
महापालिका कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, विजय खेडकर, दिपाली चौगुले, अंनत जवादवार, सहायक संचालक व नगररचनाकार ललीत खोब्रागडे, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सहाय्यक आयुक्त मयुरी कदम, सुनील लोंढे, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, शरद देशमुख, गणेश शिंपी, मनिष हिवरे, अलका पवार, सलोनी निवकर, प्राजक्ता कुलकर्णी, विनोद केणे, एकनाथ पवार, यशवंत सगळे, श्रद्धा बाविस्कर, शांताराम चौधरी, राजा बुलानी, अंकुश कदम व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते