उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून विकास कामाची स्थळ पाहणी, ठेकेदार व अधिकाऱ्याचे दणाणले धाबे
By सदानंद नाईक | Updated: April 11, 2025 21:45 IST2025-04-11T21:44:00+5:302025-04-11T21:45:13+5:30
आयुक्तानी पाहणी करीत मुदतीत सर्व विकास कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.

उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून विकास कामाची स्थळ पाहणी, ठेकेदार व अधिकाऱ्याचे दणाणले धाबे
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी वालधुनी नदीवरील पूल, अग्निशमन दलाचे नवीन कार्यालय, स्मार्ट पर्किंग आदी विकास कामाची पाहणी. केली. आयुक्तानी पाहणी करीत मुदतीत सर्व विकास कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशनला जोडणारा वालधुनी नदीवर बांधलेला पूल, पुलाच्या दोन्ही बाजूच्या दुभाजकावर केलेली रंगरंगोटी, वालधुनी नदीची पावसाळ्यापूर्वी केली जात असलेली साफसफाई, स्टेशन परिसरातील स्मार्ट पार्किंग व्यवस्था, गणेश विसर्जन घाट, परिवहन बस आगाराचे काम आदी कामाची आयुक्त मनीषा. आव्हाळे यांनी पाहणी करून मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. याठिकाणी वालधुनी नदीला संरक्षण भिंत बांधण्याचे कामही सुरु आहे. याबाबतही सबंधित अधिकारी व ठेकेदाराला आयुक्तानी सूचना दिल्या आहेत.
कॅम्प नं-३ याठिकाणी नवीन अग्निशमन इमारत बांधण्यात आले असून इमारतीची पाहणी करून विभागाची नवीन फायर वाहने लावणे. याबाबत सूचना दिल्या आहेत. शहाड रेल्वे स्टेशन येथील पुलाखालील मोकळ्या जागेवर स्मार्ट पार्किंग बनविणे व परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांच्यासह सबंधित अधिकारी, ठेकेदार आदिजण उपस्थित होते.