शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

एमएमआरडीए क्षेत्रात उल्हासनगर सर्वाधिक प्रदूषित शहर, हवेची गुणवता ३०१, फटाक्यांची आतिषबाजी, गुन्हा दाखल नाही

By सदानंद नाईक | Updated: November 13, 2023 19:58 IST

शहरात मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना, सोमवारी सकाळी पर्यंत शहरातील एकाही पोलीस ठाण्यात नियमबाह्य फटाके फोडणार्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनावर टिका होत आहे. 

उल्हासनगर : एमएमआरडीए क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून सोमवारी उल्हासनगरची नोंद झाली असून हवेची गुणवत्ता ३०१ वर गेली. रविवारी रात्रभर फटाक्यांची आतिषबाजी होऊन एकाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याने, पोलीस व महापालिका प्रशासनाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महाराष्ट्रात आहे की नाही. असा प्रश्न येथील अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांना पडतो. शासनाने घातलेल्या अटीशर्तीचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याने, शहर बकाल झाले. हवेचे प्रदूषण बघता सायंकाळी ७ ते रात्री १० वाजे पर्यंत फटाके फोडण्याची मुभा दिली. मात्र शहरात मध्यरात्री पर्यन्त कानठळ्या बसणाऱ्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. यावेळी महापालिका अधिकारी अथवा पोलीस कुठेच फिरकतांना दिसले नाही. सर्व कारभार देवभरोसे सुरू होता. रविवारी दिवाळीच्या दिवशी शहरातील हवेची गुणवत्ता २१९ होती. मात्र सोमवारी सकाळी हवेची गुणवत्ता रेड झोन मध्ये जाऊन ३०१ वर गेली. एमएमआरडीए क्षेत्रात ही हवेची गुणवत्ता सर्वाधिक धोकादायक नोंदविली गेली.

शहरात एकही गुन्हा नाही -शहरात मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना, सोमवारी सकाळी पर्यंत शहरातील एकाही पोलीस ठाण्यात नियमबाह्य फटाके फोडणार्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनावर टिका होत आहे. 

शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा ऐन दिवाळीपूर्वी पाऊस पडल्याने, शुक्रवारी व शनिवारी शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन शहर ग्रीन झोन मध्ये आले. मात्र रविवारी दिवाळीच्या दिवसी हवेची गुणवत्ता ऑरेंज झोन म्हणजे २१९ वर गेली. तर सोमवारी सकाळी हीच गुणवत्ता ३०० पार झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.

 महापालिकेचे सहकार्य नाही दिवाळीत रात्री १० नंतर कानठळ्या बसणाऱ्या फटाक्याची आतिषबाजी झाली. मात्र महापालिकेने सहकार्य न केल्याने, एकही गुन्हा दाखल झाला नाही. अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी खाजगीत देत आहेत.

 पोलीसा सोबत महापालिका अधिकारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सोमवार पासून पोलिसासोबत महापालिका प्रभाग अधिकारी गस्त घालणार असल्याची माहिती दिली. फटाके फोडणार्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

पाच तक्रारीची माहिती -प्रदूषणबाबत काम करणाऱ्या हिराली फौंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी फटाक्यांची आतिषबाजी व हवेतील घसरलेली गुणवत्ताबाबत चिंता व्यक्त केली. तसेच एका दिवशी पाच तक्रारी केल्याची माहिती दिली. 

टॅग्स :pollutionप्रदूषणDiwaliदिवाळी 2023Policeपोलिस