उल्हासनगरचा महापौर भाजपाचाच

By Admin | Updated: January 14, 2017 06:32 IST2017-01-14T06:32:28+5:302017-01-14T06:32:28+5:30

उल्हासनगरमध्ये एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने सर्व तयारी पूर्ण केली असून महापौर भाजपाचाच असेल, अशा सूचक

Ulhasnagar mayor is the BJP candidate | उल्हासनगरचा महापौर भाजपाचाच

उल्हासनगरचा महापौर भाजपाचाच

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने सर्व तयारी पूर्ण केली असून महापौर भाजपाचाच असेल, अशा सूचक शब्दांत पक्षाचे नेते कुमार आयलानी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्र्यांसोबत ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या चर्चेचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. ओमी कलानी यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल त्यांनी ‘नो कॉमेंटस’ एवढीच प्रतिक्रिया दिली. शिवसेना आणि साई पक्षासोबतच आमची तूर्त युतीची बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले.
भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयलानी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ ओमी कलानी यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा मात्र भाजपाने इन्कार केला. निवडणुकीबाबत, जागावाटपाबाबत पक्षाच्या वेगवेगळ््या गटांचे काय म्हणणे आहे तेही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Ulhasnagar mayor is the BJP candidate