उल्हासनगरमध्ये विनयभंग प्रकरणी जेल मधून सुटताच आरोपीने सहकार्याच्या मदतीने पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा वाजवित फटक्याची आतिषबाजी केली होती. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच टिकेचा बडीमार सुरु झाला. अखेर उल्हासनगर पोलिसांनी दखल घेत रोहित झा याच्यासह ९ पेक्षा जास्त सहकार्यवर रविवारी गुन्हा दाखल केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर रोहित झा याने सहकार्यांसह यादव नावाच्या तरुणाला मारहाण करून त्याच्या दोन बहिणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. स्थानिक नागरिकांनी झा याच्यासह त्याच्या टोळक्याला या कृत्याबाबत चोप दिला होता.
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात परस्पर गुन्हे दाखल होऊन रोहित झा याला जेल मध्ये जावे लागले होते. शुक्रवारी त्याची जेल मधून सुटका झाल्यावर त्याच्या साथीदारांनी धुमधडाक्यात त्याचे स्वागत केले.
तसेच विनयभंग केलेल्या मुलीच्या घरा समोर झा व त्याच्या साथीदारानीं बँडबाजा वाजून फटक्याची आतिषबाजी केली. याप्रकाराने परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे झाली होती.
पोलीस उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी याप्रकाराची दखल घेतली. गैरकायदयाची मंडळी एकत्र जमविणे, मोटरसायकल रॅली व मिरवणूक काढणे, सार्वजनिक रस्ते बंद करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, विनापरवाना बँडबाजा वाजून फटक्याची आतिषबाजी करणे.
याप्रकरणी रोहित बिपीन झा, आशिष उर्फ सोनामनी बिपीन झा, अब्दुल सोहेल, आरिफ मोहम्मद सैय्यद, सुमित आनंद गायकवाड, परशु सदाशिव संपाल, रेखा बिपीन झा, सागर सुरडकर व इतर सहकारी यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शहरातून कौतुक होत असून अश्या गुंड टोळ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.