उल्हासनगरात ऑनलाईन २६ लाख ७१ हजाराने एकाची फसवणूक, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: May 5, 2025 20:19 IST2025-05-05T20:19:33+5:302025-05-05T20:19:47+5:30
Ulhasnagar Cyber Crime News: दररोज हजार ते पंधराशे रुपये इनकम कमाविण्याचे आमिष दाखवून व्हाट्स ऍपवरील एका वेबसाईटवर ऍकशन खाते उघडून त्याद्वारे २६ लाख ७१ हजाराने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला.

उल्हासनगरात ऑनलाईन २६ लाख ७१ हजाराने एकाची फसवणूक, गुन्हा दाखल
- सदानंद नाईक
उल्हासनगर - दररोज हजार ते पंधराशे रुपये इनकम कमाविण्याचे आमिष दाखवून व्हाट्स ऍपवरील एका वेबसाईटवर ऍकशन खाते उघडून त्याद्वारे २६ लाख ७१ हजाराने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणारे प्रकाश अवसू वानखेडे यांच्या मोबाईलवरील व्हाट्सअपवर ३ एप्रिल २०२५ रोजी दररोज हजार ते पंधराशे रुपये कमाविण्याचे आमिष दाखविणारा मॅसेज आला. त्यासाठी विलियम सोनोमा इंटरनॅशनल कंपनीच्या वेबसाईटवर ऍकशन खाते उघडण्यास सांगितले. वानखेडे यांनी यावर विश्वास ठेवून मिलीयम सोनोमा इंटरनॅशनल कंपनीच्या वेबसाईटवर ऍकशन खाते उघडले. इनकमच्या अमिषाला बळी पडून वानखडे यांनी कॅनरा बॅंकच्या खात्यातून वेबसाईटच्या ऍकशन खात्यात ३ एप्रिल ते आजपर्यंत पैसे भरत गेले. एकूण २४ लाख ६१ लाख ८३६ रुपये भरल्यानंतरही कोणतेही इनकम मिळाले नसल्याने, त्यांना याबाबत संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर, त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.