उल्हासनगर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडून विकास कामाची पाहणी, आयुक्ताच्या निर्णयाने अधिकारी व ठेकेदाराचे उडाले धाबे
By सदानंद नाईक | Updated: January 21, 2025 18:55 IST2025-01-21T18:54:36+5:302025-01-21T18:55:30+5:30
उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम गेल्या २ वर्षापासून संथ गतीने सुरु आहे.

उल्हासनगर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडून विकास कामाची पाहणी, आयुक्ताच्या निर्णयाने अधिकारी व ठेकेदाराचे उडाले धाबे
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका नवनिर्वाचित आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सोमवारी एमएमआरडीएद्वारे सुरु असलेले एकूण ७ रस्ते, गोलमैदान व व्हिटीसी ग्राउंड येथील क्रिडा संकुल व अन्य विकास कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण सेवकांनी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे उपस्थित होते.
उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम गेल्या २ वर्षापासून संथ गतीने सुरु आहे. तसेच ४२६ कोटीच्या भुयारी गटार योजने अंतर्गत संपूर्ण शहरांत रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकले जात आहेत. मात्र खोदलेले बहुतांश रस्ते दूरस्त केले नसल्याने, सर्वत्र धूळ व खोदलेल्या रस्त्याचे साम्राज्य आहे. नवनियुक्त आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सोमवारी शहरांचा दौरा करून या विकास कामाची पाहणी करून आवश्यक सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गोलमैदान येथील प्रस्तावित कामाचे प्रकल्प नकाशे व संपूर्ण कामाचे सलागाराद्वारे सादरीकरण करणे, एमएमआरडीएद्वारे सुरु असलेल्या ०७ रस्त्यांची कामे जलद गतीने होण्याकरीता कामाच्या भौतिक प्रगतीची दैनंदिन पाहणी करणे,, रस्त्यावरील अतिक्रमण हटविण, झाडे कापणे, भुयारी गटार योजनेची कामे आदी कामाबाबत आयुक्तानी सबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच रस्ते कामाच्या ठिकाणी बेरेकेटीग करणे, कामाचे नाव, संबंधीत विभाग, कामाची प्राकलनीय रक्कम, ठेकेदाराच्या नाव, संपर्क नंबर दर्शविणारे फलक लावण्याचे आदेशही आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले आहे.
आयुक्तानी घेतलेले निर्णय
१) वाहतूक व्यवस्थेसाठी अनधिकृत फेरीवाल्यांवर त्वरित कारवाई करून वाहतुक पोलिसांसोबत बैठकचे आदेश
२) व्हीटीसी ग्राउंड येथील बंद असलेल्या क्रिडा संकुल ठेकेदारास नोटीस बजावण्याचे आदेश
३) गोल मैदान परिसर, व्हीटीसी ग्राउंड रस्ता, स्वर्गद्वार स्मशानभूमी या ठिकाणी कचरा दिसून आल्यामुळे संबंधित स्वच्छ्ता निरीक्षक ह्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.
४) शहरात दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे झाली नाहीतर, शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत आयुक्तानी दिले.