उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बनसोडे निलंबित, १०८ अॅम्ब्युलन्स व तरुणाचा मृत्यू प्रकरण भोवले 

By सदानंद नाईक | Updated: March 6, 2025 19:07 IST2025-03-06T19:06:16+5:302025-03-06T19:07:23+5:30

Ulhasnagar News: अत्यवस्थ रुग्णाला १०८ नंबरची ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून न दिल्याने रुग्णांचा २३ जानेवारीला मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकारणी विधानसभेत तारांकित प्रश्न उचलण्यात आल्यावर आरोग्य विभागाने रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्यासह दोघा डॉक्टरांना निलंबित करण्यात आले.

Ulhasnagar Central Hospital District Surgeon Dr. Bansode suspended | उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बनसोडे निलंबित, १०८ अॅम्ब्युलन्स व तरुणाचा मृत्यू प्रकरण भोवले 

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बनसोडे निलंबित, १०८ अॅम्ब्युलन्स व तरुणाचा मृत्यू प्रकरण भोवले 

- सदानंद नाईक 
उल्हासनगर - अत्यवस्थ रुग्णाला १०८ नंबरची ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून न दिल्याने रुग्णांचा २३ जानेवारीला मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकारणी विधानसभेत तारांकित प्रश्न उचलण्यात आल्यावर आरोग्य विभागाने रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्यासह दोघा डॉक्टरांना निलंबित करण्यात आले.

उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील राहुल इंदाले या ३५ वर्षीय इसमाची तब्येत बिघडल्याने, गेल्या महिन्यात मध्यवर्ती रुग्णालयात भरती केले होते. २३ जानेवारीला गुरुवारी दुपारी ३ वाजता राहुल यांची तब्येत बिघडल्यावर, पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. त्यासाठी १०८ नंबरच्या ऍम्ब्युलन्सला फोन केला. मात्र दोन तास ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार नाही, असे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. यावेळी दुसरी ऍम्ब्युलन्स रुग्णाला उपलब्ध करून दिली नाही. तर दुसरीकडे रुग्णाची तब्येत बिघडत होती. नातेवाईकानी रुग्णालयाची अथवा खाजगी ऍम्ब्युलन्स बोलाविण्याची विनंती डॉक्टर व नर्सला केल्यानंतरही रुग्णवाहीका उपलब्ध करून दिली नाही.

मध्यवर्ती रुग्णालयात चाललेला गोंधळ व १०८ नंबरची ऍम्ब्युलन्स सायंकाळीचे साडे सात वाजे पर्यंत आली नाही. दरम्यान राहुल इंदाले यांची तब्येत बिघडवून त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी आक्रोश करून रुग्णालय डॉक्टर, नर्स व १०८ च्या ऍम्ब्युलन्स हे सर्वजन राहुल यांच्या मृत्युंला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, १०८ नंबरची रुग्णवाहिका यांचे धिंडवडे काढले होते. याप्रकरणी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी १०८ नंबर ऍम्ब्युलन्सची सेवा देणारा ठेकेदार व सबंधित डॉक्टर, नर्सला कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. दरम्यान याप्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उचलल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बनसोडे यांच्यासह दोघे डॉक्टरावर निलंबनाची कारवाई केली.

Web Title: Ulhasnagar Central Hospital District Surgeon Dr. Bansode suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.