उल्हासनगरच्या अर्थसंकल्पात प्रभावी करवसुलीवर भर

By Admin | Updated: June 29, 2017 02:53 IST2017-06-29T02:53:07+5:302017-06-29T02:53:07+5:30

कोणतीही करवाढ नसलेला, पण करांच्या प्रभावी वसुलीवर आणि त्यातून उत्पन्नवाढीवर भर देणारा उल्हासनगरचा अर्थसंकल्प आयुक्त

Ulhasnagar budget emphasizes effective tax recovery | उल्हासनगरच्या अर्थसंकल्पात प्रभावी करवसुलीवर भर

उल्हासनगरच्या अर्थसंकल्पात प्रभावी करवसुलीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कोणतीही करवाढ नसलेला, पण करांच्या प्रभावी वसुलीवर आणि त्यातून उत्पन्नवाढीवर भर देणारा उल्हासनगरचा अर्थसंकल्प आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्थायी समिती सभापती कांचन लुंड यांना बुधवारी सादर केला. तो ५८६.४५ कोटींचा आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि नियमनावर त्यात भर आहे.
निवडणुकीमुळे तो उशिरा सादर झाला. यंदा मात्र करवाढीऐवजी आयुक्तांनी थकबाकी वसुलीवर भर दिला. त्यात तीन कोटी ७३ लाख शिल्लक दाखवली आहे.
मालमत्ता कर वसुलीतून १८५ कोटी, पाणी बिलापोटी ४५ कोटी, २२५ कोटींची अनुदाने, ६५ कोटी इमारत बांधकाम परवान्यातून, ६२.१४ कोटी एमआरटीपीअंतर्गत कारवाईतून असे उत्पन्न दाखविले आहे. खर्चात सर्वात मोठा वाटा म्हणजे ११२ कोटी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, एमएमआरडीएअंतर्गत पाच मुख्य रस्त्यासाठी ५० कोटी, आरोग्य विभागासाठी ३३ कोटी, उद्यानांच्या सुशोभिकरणासाठी ८.३३ कोटी, शिक्षण मंडळासाठी ५३ कोटी, महिला व बालकल्याणासाठी पाच कोटी, नव्या रस्त्यांसाठी १७ कोटींचा खर्च दाखविला आहे.

Web Title: Ulhasnagar budget emphasizes effective tax recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.