उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लोणावळ्यात बैठक

By सदानंद नाईक | Updated: February 2, 2023 17:58 IST2023-02-02T17:58:00+5:302023-02-02T17:58:09+5:30

शहर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बुधवारी व गुरवारी अशी दोन दिवस लोणावळ्यात बैठक झाली.

Ulhasnagar BJP and Shiv Sena Shinde group office bearers meeting in Lonavala | उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लोणावळ्यात बैठक

उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लोणावळ्यात बैठक

उल्हासनगर : शहर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बुधवारी व गुरवारी अशी दोन दिवस लोणावळ्यात बैठक झाली. बैठकीत शहर विकासा बाबत चर्चा होऊन ५०० कोटींची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. 

उल्हासनगरचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांच्या संकल्पनेतून भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱयांची बुधवारी व गुरवारी असे दोन दिवस लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट मध्ये बैठक बोलाविली होती. बैठकीत शहर विकास कामाची चर्चा होऊन, त्यासाठी ५०० कोटींची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदीकडे केले जाणार आहे. असे माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. यावेळी भाजप शहाराध्यक्ष जमनू पुरसवानी, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, रमेश चव्हाण, अरुण आशान, नाना बागुल,मनोहर खेमचंदानी आदीजन उपस्थित होते.

Web Title: Ulhasnagar BJP and Shiv Sena Shinde group office bearers meeting in Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.