शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 17:10 IST

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

रणजीत इंगळे, Thane Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी आणि त्यांचे चालक अनिल मोरे यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांकडून एम. के. मढवी यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. याआधी देखील असे धमकवण्याचे प्रकार झाले आहेत का? याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येणार असल्याने मढवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, २९ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार असून राजन विचारेंसोबत निष्ठावंत असणारे एम. के. मढवी हे मात्र तुरुंगात असणार आहेत.

ठाणे लोकसभेत कसं आहे राजकीय चित्र?

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी अद्याप महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजन विचारे यांनी नुकताच उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी ४३ उमेदवारी अर्ज घेण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ मे असून २७ एप्रिल, २८ एप्रिल आणि १ मे रोजी सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राजन विचारे यांसह  ४ उमेदवारी अर्ज घेण्यात आले असून भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज घेण्यात आला नाही. उमेदवारी अर्ज घेतलेल्या नेत्यांमध्ये भारतीय राजनिती विकास पार्टी १, आम आदमी पार्टी १, अपक्ष १९, भूमीपुत्र पार्टी १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी २, बहुजन शक्ती १, संयुक्त भारत पक्ष २, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन बहुजन सेना २,  पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ३, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी २, बहुजन मुक्ती पार्टी २, भारतीय जवान किसान पार्टी २ आदी राजकीय पक्षांचा समावेश आहे.

टॅग्स :thane-pcठाणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४