शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"मनात आणलं तर याक्षणी यांची ही गुंडगिरी..."; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 15:13 IST

असं निघृण काम करणारी माणसे ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत असा घणाघात ठाकरेंनी केला. 

ठाणे - शिवसैनिक शांत राहिलेत याचा अर्थ ते सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं तसं नपंसुक नाही. जर मनात आणले तर ठाण्यातून ही गुंडगिरी मूळासकट उखडून टाकण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे. ताबडतोड गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. बिनकामाचा आयुक्त यांना निलंबित करा आणि कणखर आयुक्त ठाण्याला दिला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ठाण्यात युवती कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर त्यांनी हॉस्पिटलला जाऊन जखमी पदाधिकाऱ्याची विचारपूस केली. 

यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नपंसुक म्हटलं, त्याची प्रचिती ठाण्यात आली. ठाण्याची ओळख ही शिवसेनेचे ठाणे, जीवाला जीव देणाऱ्या, महिलांचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचे ठाणे, धर्मवीर आनंद दिघेंचे ठाणे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत ठाणे अशी ओळख आहे. ही ओळख पुसून गुंडाचे ठाणे असं करण्याचा एक प्रयत्न सुरू झाला आहे. आजपर्यंत मी गँग ऐकलं होतं. आता महिलांची गँग, महिला गुंडगिरी करू लागल्या तर आपल्या देशाचे, राज्याचे, ठाण्याचे काय होणार असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं असं नाही. आता या क्षणाला आम्ही यांची गुंडगिरी ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उखडून फेकून देऊ शकतो. जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर गुंड आणि तोतये शिवसैनिक जे बाळासाहेबांचा फोटो, भगवा झेंडा घेऊन नाचतायेत त्यांना हा अधिकार नाही. महिला गुंडाकरवी हल्ले करणारे हे नपंसुकच म्हटले पाहिजे पोलीस आयुक्तांना भेटायला गेलो पण आयुक्तच नाहीत. गुंड महिलांनी हल्ला केला, या महिला संस्कृतीत बसणाऱ्या नाहीत. व्हिडिओ आहेत, हल्लेखोरांची नावे आहेत. मातृत्वाचा उपचार घेणारी रोशनी तरी तिला पोटावर लाथा मारल्या आल्या. असं निघृण काम करणारी माणसे ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत असा घणाघात ठाकरेंनी केला. 

राज्य मंत्रिमंडळात गुंड पोसणारं खाते निर्माण करावं गुंडगिरी वाढत चालली आहे. पत्रकारांना धमक्या दिल्या जातायेत, महिलांना मारहाण केली जातेय. फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. गुंडागर्दीचं राज्य सुरू असून आता मुख्यमंत्र्यांना गुंडमंत्री म्हणायचं. मी म्हणत नाही पण हे लोकं ठरवतील. प्रत्येकाकडे खाते असते. मंत्रिमंडळात विशेष खाते निर्माण करून त्यात गुंड पोसण्याचं काम करणाऱ्या खाते द्यावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना