लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापालिका निवडणुकीकरिता महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून उद्धवसेनेच्या वाट्याला ५० जागा, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे ४० ते ४५ जागा, मनसेला २५ ते ३० आणि कॉंग्रेसच्या वाट्याला १५च्या आसपास जागा येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. कॉंग्रेसने ३५ जागांचा प्रस्ताव दिला होता; तर राष्ट्रवादी (शरद पवार) ५० जागांसाठी आग्रही होती. उद्धवसेना आणि मनसे या पक्षांनी ३०-३० जागांवर लढावे, असा दबाव होता. तर दुसरीकडे उद्धवसेना आणि मनसेने विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे कोणकोणते प्रभाग या दोन्ही पक्षांसाठी फायद्याचे ठरू शकतात, त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. यात वागळे, किसनगर, घोडबंदर, जुन्या ठाण्यातील भाग, वर्तकनगर आदींसह इतर काही प्रभागांवर लक्ष केंद्रित केले. तिकडे कळवा, मुंब्य्रात मोकळीक मिळावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने केली. कॉंग्रेसनेही मुंब्य्रातही काही जागांवर दावा केला. तेथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष कॉंग्रेसला काही जागा सोडण्यास तयार असल्याचेही बोलले जाते. महाविकास आघाडीतील पक्ष तडजोडीच्या जवळ आल्याचे सांगण्यात आले.
Web Summary : Maha Vikas Aghadi finalizes seat-sharing for Thane municipal elections. Shiv Sena (Uddhav) to contest 50, NCP 45, MNS 25. Congress may get around 15 seats, with negotiations near conclusion focusing on key ward advantages for each party.
Web Summary : ठाणे नगर निगम चुनावों के लिए महा विकास अघाड़ी में सीट बंटवारा हुआ तय। शिवसेना (उद्धव) 50, एनसीपी 45, मनसे 25 सीटों पर चुनाव लड़ेगी। कांग्रेस को लगभग 15 सीटें मिल सकती हैं, समझौते पर बातचीत अंतिम चरण में है।