शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दोन महिलांचा विनयभंग करणाऱ्या ‘झोमॅटो’च्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:32 IST

एकीकडे ‘झोमॅटो’च्या महिला प्रतिनिधीने नवी मुंबईच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांनाच ठाण्यात दोन महिलांचा विनयभंग करणा-या ‘झोमॅटो’च्याच छोटेलाल सोनी आणि गजानन शिंदे या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देघोडबंदर रोडवरील घटनाशिवीगाळ करीत केला विनयभंगदुचाकी चालविण्यावरुन घातला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोडने ब्रम्हांड सिग्नल येथून स्कूटरवरून घरी जाणा-या ३७ आणि २७ वर्षीय दोन महिलांचा विनयभंग करणा-या छोटेलाल सोनी (३५, रा. कोपरी, ठाणे) आणि गजानन शिंदे (२९, रा. कळवा, ठाणे) या दोघांनाही कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. हे दोघेही ‘झोमॅटो’ या अन्न पदार्थांची सेवा पुरविणाºया कंपनीचे डीलीवरी प्रतिनिधी आहेत.राबोडी येथे राहणारी ३७ वर्षीय पीडित महिला ही घोडबंदर रोडवरील एका रुग्णालयात तिच्या आईच्या उपचारासाठी आली होती. २६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास उपचारानंतर तिने आईला रिक्षात बसवून दिले. त्यानंतर ती तिच्या २७ वर्षीय मैत्रिणीसमवेत स्कूटरवरून राबोडी येथे जात होती. त्या सेंट झेवियर्स स्कूलच्या समोरील ब्रम्हांड सिग्नलवर आल्या असतांना त्यांच्या मागून आलेल्या या दोघांपैकी मागे बसलेल्या शिंदे याने त्यांना शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला. तर मोटारसायकलस्वार छोटेलाल यानेही त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याचवेळी शिंदे याने त्यांना मारहाणीसाठी हातही उगारला. तेंव्हा तिथे असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांनी ठाणे शहर नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनी त्याठिकाणी तत्काळ धाव घेतली. वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे यांच्या पथकाने या दोघांनाही रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अटक केली. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग