Two youths who came to the picnic drowned in the paddy river of Khadavali | पिकनिकला आलेले दोन युवक खडवलीच्या भातसा नदीत बुडाले 

पिकनिकला आलेले दोन युवक खडवलीच्या भातसा नदीत बुडाले 

टिटवाळा : मुंबईतून आपल्या मित्रांसोबत खाद्वालेच्या भातसा नदीत पिकनिक करण्यासाठी आलेले  दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. 

टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असलेल्या खडवली येथील भातसा नदीच्या ठिकाणी गुरुवारी दुपारी मुंबईतील वडाळा परिसरातील मित्रांचा ग्रुप पिकनिकसाठी आले होते. यावेळी दीड वाजण्याच्या सुमारास ते भातसा नदीत  पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता  दोन तरुण नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

कुष्णा उर्फ  श्रीधर धरणे (१९ ) हा नदीला पाण्यात पोहत असताना अचानक पाणी वाढले. भवरा तयार झाला त्यात तो अडकला यातील दुसरा मित्र अक्षय गोकुळ भरमे वय २१वर्षे हा त्याला वाचविण्यासाठी गेला असताना ते दोघेही खोल पाण्यात बुडून  दिसेनासे झाले असल्याची माहिती त्यांचा मित्र प्रसाद राणे यांनी दिली. दोघेही मुंबई येथील आय. टी. आय. कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समजते. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. अग्निशमन दलाच्या जवाना सह स्थानिकांच्या मदतीने नदीपत्रात बुडालेल्या दोघांच्या देहाच्या शोध कार्य सुरु आहे. पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार कुष्णा उर्फ  श्रीधर धरणे वय १७वर्षे रा. जोगेश्वरी, तसेच अक्षय गोकुळ भरमे वय २१वर्षे रा. वडाळा या ठिकाणी राहणारे आहेत .

Web Title: Two youths who came to the picnic drowned in the paddy river of Khadavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.