उल्हास नदीवरील बॅरेज धरणाच्या खालच्या बाजूला बुडाले दोन तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 06:00 IST2017-09-20T06:00:30+5:302017-09-20T06:00:32+5:30
मंगळवारी उल्हास नदीवरील बॅरेज धरणाच्या खालच्या बाजूला दोन तरुण बुडाले. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांचा शोध घेत होते. कॉलेजमधील पाच तरुण येथे आले होते.

उल्हास नदीवरील बॅरेज धरणाच्या खालच्या बाजूला बुडाले दोन तरुण
बदलापूर : मंगळवारी उल्हास नदीवरील बॅरेज धरणाच्या खालच्या बाजूला दोन तरुण बुडाले. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांचा शोध घेत होते. कॉलेजमधील पाच तरुण येथे आले होते. पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने, त्यांच्यापैकी अंबरनाथ येथील विनायक वेलकर आणि उल्हासनगर येथील सिद्धेश पाडवे हे दोघे वाहून गेले. त्यांच्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघे बेपत्ता झाले. बदलापूर अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्यांचा शोध घेत होते, पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोधमोहीम थांबविली.