शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू; तीन दिवसांत चौघांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 18:13 IST

काटईनाका ते कर्जत आणि कल्याण ते कर्जत हे दोन्ही राज्य महामार्ग धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ : काटईनाका ते कर्जत आणि कल्याण ते कर्जत हे दोन्ही राज्य महामार्ग धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांत चार तरुणांचा मृत्यू झाल्याने रस्ता आणि तेथील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.बदलापूर येथे राहणारे तरुण दिनेश मुकणे आणि आनंद शिंदे हे बदलापूरहून अंबरनाथला आपल्या दुचाकीवरून येत होते. त्याचवेळी अंबरनाथ दिशेकडे जाणा-या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या नादात या तरुणांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हे दोघे तरुण ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली आले. त्यातील दिनेश मुकणे याचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद शिंदे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातात चूक कोणाची आहे, याचे अद्याप पुरावे पुढे आलेले नाहीत. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताच्या दोन दिवस आधीच एमएमआरडीएच्या आनंदनगर एमआयडीसीसमोरील रस्त्यावर देखील दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातात मृत झालेल्या तरुणांची दुचाकी ही वेगात असली तरी ज्या ठिकाणी हा अपघात घडला ती जागा एमएमआरडीएच्या अधिका-यांमुळे अपघाताचे स्थान ठरले आहे. राज्य महामर्गावर अवघड वळण असू नये हे अपेक्षित असताना एमएमआरडीएने या ठिकाणी मोठे वळण ठेवले आहे. त्या वळणावर गाडी चालकांना पुढचा रस्ता दिसत नसल्याने त्यांची धडक ही थेट रस्त्याच्या दुभाजकाला होते. त्याच अपघातात या दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. या आधी देखील याच रस्त्यांवर अनेक दुचाकीस्वारांसोबत चारचाकी गाड्यांचेही अपघात घडले आहे.या ठिकाणी असलेले अवघड वळण काढण्याची गरज असताना देखील त्याचा कोणताच विचार एमएमआरडीए करीत नाही. तर सुरक्षेसाठी या ठिकाणी वेग कमी करण्याची कोणतीच यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. या रस्त्यासोबत फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर देखील सुरक्षेचे कोणतेच उपाय करण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी रस्ता अरुंद करून ठेवला आहे. एवढेच नव्हे तर रस्त्याचे दुभाजक देखील रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात