शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

फॉरवर्ड प्रेसिजन कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या दोन कामगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 15:34 IST

अंबिकानगर भागातील फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चोरी करणाºया नितीन कांबळे (३१, रा. इंदिरानगर, ठाणे) आणि रामचंद्र जैस्वार (४९, रा. हनुमाननगर, ठाणे) या दोन कामगारांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देसीसीटीव्हीमुळे सापडले जाळयातवागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अंबिकानगर भागातील फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चोरी करणाºया नितीन कांबळे (३१, रा. इंदिरानगर, ठाणे) आणि रामचंद्र जैस्वार (४९, रा. हनुमाननगर, ठाणे) या दोन कामगारांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून चोरीतील सर्वच ४८ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.वागळे इस्टेट, रोड क्रमांक १६, अंबिकानगर येथे ३० डिसेंबर २०२१ रोजी रात्री ८.३० ते २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनिअर्स या कंपनीतून २८ किलाच्या वजनाचे २८ हजारांचे पीवी टू बुश बेअरिंग पार्टस तसेच २० हजारांचे २० किलोचे स्लायडींग बॉडी पॅकिंग प्लेट चोरीस गेले होते. याप्रकरणी कंपनीचे अधिकारी जयप्रकाश सिंग यांनी ३ जानेवारी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ, पोलीस हवालदार चंद्रकांत वाळूंज, पोलीस नाईक रोहन जाधव, दीपक बरले, आणि रत्नदीप शेलार आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फूटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याच कंपनीतील नितीन आणि रामचंद्र या दोन कामगारांना ३ जानेवारी रोजी रात्री अटक केली. त्यांनी या चोरीची कबूली दिली असून त्यांच्याकडून चोरीतील हा सर्व ४८ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी