दिव्यात स्लॅब कोसळून दोन महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST2021-07-25T04:33:36+5:302021-07-25T04:33:36+5:30

मुंब्राः दिव्यातील सिद्धांत पार्क येथील वक्रतुंड सोसायटीमधील तळ अधिक एक मजली जुन्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या एका पतपेढीच्या ...

Two women were injured when a slab fell on a lamp | दिव्यात स्लॅब कोसळून दोन महिला जखमी

दिव्यात स्लॅब कोसळून दोन महिला जखमी

मुंब्राः दिव्यातील सिद्धांत पार्क येथील वक्रतुंड सोसायटीमधील तळ अधिक एक मजली जुन्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या एका पतपेढीच्या कार्यालयाचा स्लॅब खालच्या रूममध्ये कोसळल्याची घटना घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत तेथे काम करणाऱ्या अर्पिता साटम (३५) आणि सिद्धी पडावेकर (३५) या दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. साटम यांच्या डोक्यासह हातापायाला आणि पाठीला दुखापत झाली असून, पडावेकर यांच्या हातापायाला दुखापत झाली आहे. दोघींनाना क्रमशः मुंब्रा आणि दिव्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून स्लॅब कोसळलेले रूम सील केले असून, इमारतीमध्ये राहात असलेल्या कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था ठामपाच्या शाळा क्रमांक ७८ मध्ये केली असल्याची माहिती ठामपाच्या आपत्काकालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

Web Title: Two women were injured when a slab fell on a lamp