उल्हासनगरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:32+5:302021-03-21T04:39:32+5:30
उल्हासनगर : शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, एकाचदिवशी चार दुचाकी चोरीला गेल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात दाखल झाली ...

उल्हासनगरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ
उल्हासनगर : शहरात चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, एकाचदिवशी चार दुचाकी चोरीला गेल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. शहर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्याआधारे चोरांवर अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे.
कॅम्प नं. १ परिसरात राहणाऱ्या अनिता आहुजा व सुभाषचंद्र झा यांनी १७ मार्च रोजी रात्री घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला गेली असून, याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अशोक आहुजा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात १८ मार्च रोजी उभी केलेली दुचाकी चोरीला गेली असून, याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कॅम्प नं. ५ गांधी रोडशेजारील इमारतीसमोर इंदर वधारिया यांनी १८ मार्चला दुचाकी उभी केली होती. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.