माळशेजला पिकनिकला जाताना दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 26, 2016 17:43 IST2016-06-26T17:43:25+5:302016-06-26T17:43:25+5:30

माळशेज घाटात पिकनिकला जात असताना एम एच 03- बीएक्स-1100 या दुचाकीला कल्याण मुरबाड महामार्गावर अपघात घडला.

Two-wheeler accident, one's death while going to Malashi's picnic | माळशेजला पिकनिकला जाताना दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

माळशेजला पिकनिकला जाताना दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत 

कल्याण, दि. २६ - माळशेज घाटात पिकनिकला जात असताना एम एच 03- बीएक्स-1100 या दुचाकीला कल्याण मुरबाड महामार्गावर अपघात घडला. यात गणेश रामदास फाफाळ (25) याचा जागीच मृत्यू झाला तर हेमंत हांडे (20) याचा पाय मोडला आहे. जखमीला कल्याण येथील आयुष्य या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
टिटवाळा पोलीसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, गणेश फाफाळ व हेमंत हांडे हे सकाळी घाटकोपर पश्चिम भटवाडी येथून आपल्या एम एच 03- बीएक्स-1100 या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून माळशेज घाटात पिकनिकला निघाले होते. 
 
सकाळी दहाच्या सुमारास दुचाकी कल्याण मुरबाड महामार्गावर मामनोली राष्ट्रीय सेवासंघाच्या जवळील वळणावर पोहचताच समोरून मुरबाड वरून येणार्‍या मारूती आय ट्वेंटी एम एच 04- एफ आर 5313 या गाडीला धडक देवून खाली पडले. यातून ते वाचले होते. परंतू त्याच गाडीच्या मागून येणारा टेंपो एम एच 34 ए- 3726 च्या चाकाखाली येऊन गणेश फाफाळचा मृत्यू झाला. 
 
यात हेमंत हांडे हा जखमी झाला असून त्याचा पाय तुटला आहे. टेम्पो चालकाने सदर दुचाकीस्वाराना वाचविण्याच्या प्रयत्नात आपली टेंपोही खड्यात टाकला. या विचित्र अपघाताची चर्चा सर्वत्र पसरली आहे. टिटवाळा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
 

Web Title: Two-wheeler accident, one's death while going to Malashi's picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.