दुचाकीला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST2021-02-25T04:55:03+5:302021-02-25T04:55:03+5:30
----------------------- दुचाकी चोरी कल्याण : पश्चिमेतील भोईरवाडी, शिवनेरी या ठिकाणी राहणाऱ्या तेजस सुनील याने त्याची दुचाकी तो राहत असलेल्या ...

दुचाकीला अपघात
-----------------------
दुचाकी चोरी
कल्याण : पश्चिमेतील भोईरवाडी, शिवनेरी या ठिकाणी राहणाऱ्या तेजस सुनील याने त्याची दुचाकी तो राहत असलेल्या घरासमोर उभी केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी चोरट्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------
दांडक्यांनी मारहाण
डोंबिवली : मितेश मैसेरी व त्यांच्याकडे काम करणारा मुलगा सुमीत अवटे हे मोटारीने मंगळवारी मध्यरात्री १२.३० वाजता जात होते. त्या वेळी पूर्वेतील सुयोग हॉटेल येथे मोटार आली असता विरल पेठाणी व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी दोघांना दांडक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच मोटारीचेही नुकसान केले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------
पोलीस कर्मचारी जखमी
डोंबिवली : रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अनिल भोये हे मंगळवारी सकाळी ९ वाजता इंदिरा चौक परिसरात ड्युटी बजावत होते. त्या वेळी इंदिरा चौक ते फडके रोड परिसरात भरधाव आलेल्या रिक्षाने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला आहे. या प्रकरणी रिक्षाचालक रामदास पाटील याच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------
एक लाख ७६ हजारांचा दंड वसूल
कल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न घालणाऱ्यांविरोधात केडीएमसीने जोमाने कारवाई सुरू केली आहे. सोमवार व मंगळवारी केलेल्या कारवाईत एक लाख ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकारी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करीत आहेत.
---------------
एमआरटीपी गुन्हे दाखल
डोंबिवली : पश्चिमेतील भागात सरकारी भूखंडावर पाच ते सहा मजल्यांची बेकायदा बांधकामे करणाऱ्या तिघांविरोधात महसूल विभागाच्या ठाकुर्ली मंडळ अधिकारी दीपक गायकवाड यांनी एमआरटीपी गुन्हे दाखल केले आहेत. कचरू मोरे, मयूर पाटील आणि विजय ठाकूर अशी तिघा बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
-----------------