ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत दोन हजार ७४४ ची वाढ : ४२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:35 IST2021-05-03T04:35:27+5:302021-05-03T04:35:27+5:30
ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत रविवारी दोन हजार ७४४ जणांची वाढ झाली असून ४२ रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले ...

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत दोन हजार ७४४ ची वाढ : ४२ जणांचा मृत्यू
ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत रविवारी दोन हजार ७४४ जणांची वाढ झाली असून ४२ रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख ७२ हजार ७९४ रूग्णांसह मृतांची आजवरची एकूण संख्या सात हजार ६८५ नोंदली गेली आहे.
ठाणे मनपाच्या परिसरात शुक्रवारी ७५६ रुग्ण रविवारी आढळून आले. यासह येथील रुग्णसंख्या एक लाख २० हजार ४०९ झाली. या शहरात आठ बाधित दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ६८९ झाली आहे. कल्याण डोंबिवली शहरात ७२९ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार २७५ झाली. दिवसभरातील आठ मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ४५३ मृत्यू नोंदवण्यात आले आहे.
उल्हासनगरला आजही ७४ रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्णसंख्या १९ हजार २३ झाली असून ४३६ मृतांची संख्या नोंद केली आहे. भिवंडीला दिवसभरात २४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्ण नऊ हजार ८९६ झाले असून मृत्यू ३९२ नोंदले आहेत. मीरा भाईंदरला आज २६२ रुग्णांची वाढ होऊन आठ मृतांची वाढ झाली आहे. आता येथील रुग्णसंख्या ४४ हजार १८९ झाली असून एक हजार ४९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.
अंबरनाथला १०३ रुग्णांच्या वाढीसह दोन जणांचा मृत्यू झाला. येथील रुग्णसंख्या आता १७ हजार ९४८ झाली असून ३८८ मृतांची नोंद झाली आहे. कुळगांव बदलापूरमध्ये १४९ रुग्णांची भर पडली आहे. रविवारी एकही मृत्यू झाला नाही. आता येथील १८ हजार ८०५ रुग्णांसह १९४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये आज २२३ रुग्ण आढळून आले असून दोन जण दगावले. या परिसरात आजपर्यंत २७ हजार पाच रुग्णांची वाढ होऊन ६९६ मृतांची नोंद करण्यात आली आहे.