दोन चोरांना अटक, चार मोबाईल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST2021-08-28T04:45:12+5:302021-08-28T04:45:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रेल्वेच्या क्राईम ...

दोन चोरांना अटक, चार मोबाईल हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रेल्वेच्या क्राईम ब्रँचने दोन मोबाईल चोरांना अलीकडेच अटक केली असून, त्यांच्याकडून ५२ हजार ८६० रुपये किमतीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले.
केतन सूर्यकांत पवार ऊर्फ वडा (वय २३) आणि दीपक गणेश गायकवाड (४२) दोघेही रा. वांद्रा पाडा, अंबरनाथ, पश्चिम अशी आरोपींची नावे आहेत. २२ ऑगस्ट रोजी पोलिसांना त्यांच्या बातमीदार सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या तपासात विविध गुन्ह्यांतील चोरीस गेलेले एकूण ५२ हजार ८६० रुपये किमतीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्या गुन्ह्यांचा समांतर तपास कल्याण युनिट, गुन्हे शाखा, लोहमार्ग, मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षक अशहृदिन शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. जप्त केलेल्या इतर तीन मोबाईल फोन मालकांचा शोध लागला आहे. इतर दोन मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून इतर गुन्हे उघडकीस आणणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
........
वाचली