भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली
By Admin | Updated: December 29, 2015 09:18 IST2015-12-29T09:18:37+5:302015-12-29T09:18:37+5:30
भिवंडीत तांडेल मोहल्ला भागात भोईवाडा पोलिस स्थानकाच्या मागे असलेली दुमजली इमारत मंगळवारी पहाटे पाचवाजण्याच्या सुमारास कोसळली.

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली
ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. २९ - भिवंडीत तांडेल मोहल्ला भागात भोईवाडा पोलिस स्थानकाच्या मागे असलेली दुमजली इमारत मंगळवारी पहाटे पाचवाजण्याच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले आहेत.
ढिगा-याखालून आतापर्यंत १० जणांना बाहेर काढलं आहे. अजून दोन जण ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.
जखमींना भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्तक बेग, परवेश बेग आणि अनवर बेग यांचे कुटुंबिय या इमारतीत रहात होते.