शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या मुंबईतील घरी चोरी करणारे चोरटे ठाण्यातून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:00 IST

घरगडी म्हणून आधी काम करायचे. नंतर त्याच घरात चोरी करणा-या पिंटू आणि त्रिवेणी निशाद या चोरटयांना ठाणे पोलिसांनी जेरबंद केले. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या जूहू येथील घरीही त्यांनी चोरी करुन पलायन केले होते.

ठळक मुद्देचार वर्षांपूर्वी चोरी करुन झाले होते पसारठाण्याच्या वर्तकनगरमधील चोरीही उघड६२ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत

ठाणे : सिनेअभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या मुंबईतील जुहू येथील घरात शिरून चार वर्षांपूर्वी २६ लाखांची लुट करून पळालेल्यांपैकी पिंटू निशाद (२६, रा. चिंचवड, पुणे) आणि त्रिवेणी उर्फ महेश निशाद (३३, रा. लिंक रोड, मुंबई) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ठाण्यातील एका चोरीतील ६२ हजारांचे सोन्याचे दागिनेही हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे यांनी दिली.ठाण्याच्या वसंत विहार सर्कल परिसरात घरफोडी करणारे चोरटे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांना मिळाली होती. तिच्या आधारे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली रणावरे यांच्यासह उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार, जमादार बाबू चव्हाण, हवालदार विजय गो-हे, सुनिल सोननिस आणि दिलीप तडवी आदींच्या पथकाने पिंटू आणि त्रिवेणी या दोघांना वसंत विहार भागातून १७ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांच्याकडून १२ इंच लांबीची कटावणी आणि १३ इंचाचा स्क्रू ड्रायव्हर हस्तगत केला. त्यांच्याकडे सखोल चौकशीमध्ये त्यांनी लोकमान्यनगरपाडा क्रमांक तीन येथील पांडे चाळीतील देवीदास काळे यांच्याकडे ४ आॅक्टोंबर २०१७ मध्ये केलेल्या एका चोरीचीही त्यांनी कबुली दिली. यात त्यांनी तीन तोळे सोन्याचा ऐवज चोरला होता. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीची तक्रार दाखल झाली होती. याच चोरीतील ६२ हजारांचे सोन्याचे दागिनेही त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत.घरगडी म्हणून काम आणि नंतर चोरीप्रतिष्ठीत किंवा श्रीमंतांच्या घरांमध्ये आधी घरगडी म्हणून काम करायचे. तिथे संपूर्ण टेहाळणी करुन कालांतराने तिथे चोरी करायची, अशी पिंटू निशाद आणि त्याच्या साथीदारांची चोरीची पद्धत होती. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या जूहू येथील घरीही त्यांनी आधी स्वयंपाकी म्हणून काम केले. नंतर त्यांच्याही घरात २४ जानेवारी २०१४ रोजी शिरकाव केला होता. त्यावेळी भाग्यश्री यांच्या घरातील जेवणामध्ये गुंगीकारक औषधांचा वापर करून त्यांचे सासू-सासरे यांना ठार मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या घरातून २४ लाखांचा ऐवज त्यांनी लुटला होता. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह जबरी चोरीचाही गुन्हा दाखल झाला होता. मुंबई पोलिसांनी त्यावेळी यातील दोघांना अटक केली होती. तर पिंटू आणि त्रिवेणी हे त्यातील दोघे मात्र पसार झाले होते. या दोघांनाही आता ठाणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांना २१ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाThiefचोर