शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तरुणीची छेड काढणारे दोन रोडरोमियो जेरबंद: श्रीनगर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 21:17 IST

किसननगर भागात एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग होत असतांना तिने पोलीस नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरुन श्रीनगर पोलिसांनी चौघांपैकी दोघांवर तात्काळ कारवाई केल्याची घटना शनिवारी घडली.

ठळक मुद्देचौकडीने रस्ता अडवून केला विनयभंगनियंत्रण कक्षातील तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ मदतअल्पवयीनासह दोघांची धरपकड

ठाणे: पाळीव श्वानाला घराजवळच्या परिसरात फिरविणा-या एका २३ वर्षीय तरुणीची किसननगर शिवाजीनगर भागात छेडछाड काढणा-या चौघांपैकी दोघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली. तिची छेड काढली जात असतांनाच तिने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरुन अवघ्या काही मिनिटांमध्येच पोलिसांनी ही कारवाई केली.अरबाज नियाज खान (१८, रा. कादरी मंजील, पडवळनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याच्यासह अन्य एका १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरबाज सह चौघेजण शिवाजीनगर भाजीमार्केट ठाणे महापालिका शाळेकडे जाणा-या रस्त्यावर या इव्हेंट मॅनेंजमेंटचा व्यवसाय करणा-या तरुणीची सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास छेड काढीत होते. तिच्या कुत्र्याचे नाव विचारण्याचा बहाणा करीत तिचेही त्यांनी वारंवार नाव विचारले. नंतर तिच्यावर अश्लील शेरेबाजी करीत गराडा घालून चौघांनीही तिला पुढे मागे जाण्यास मज्जाव केला. त्याचवेळी तिथून जाणाºया एका मित्रालाही तिने हा प्रकार सांगितला. ती त्याच्या मदतीने पुढे जाऊ लागल्यानंतरही त्यांनी तिचा पाठलाग करीत पुन्हा छेड काढणे सुरूच ठेवले. तिने अखेर ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या एक शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क साधून या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस नाईक आर. आर. गार्डे, टी. टी. पोटेकर, कॉन्स्टेबल ए. बी. बावणे आणि वाय. सी. राठोड आदींच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन छेड काढणा-या चौकडीपैकी दोघांची धरपकड केली. पोलिसांची व्हॅन पाहून त्यातील उर्वरित दोघांनी मात्र पलायन केले. दरम्यान, अरबाज याची ठाणे न्यायालयाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रविवारी सुटका केली. तर त्याचा साथीदार अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोमवारी भिवंडीच्या बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाMolestationविनयभंग