ठाण्यात म्हाडाच्या 2 जुन्या इमारती कोसळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 12:00 IST2017-07-19T12:00:17+5:302017-07-19T12:00:57+5:30

- ठाण्यातील वसंत विहारजवळील महाराष्ट्र नगरमध्ये असणाऱ्या म्हाडाच्या दोन जुन्या इमारती कोसळल्या आहेत.

Two old buildings in MHADA collapsed in Thane | ठाण्यात म्हाडाच्या 2 जुन्या इमारती कोसळल्या

ठाण्यात म्हाडाच्या 2 जुन्या इमारती कोसळल्या

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 19- ठाण्यातील वसंत विहारजवळील महाराष्ट्र नगरमध्ये असणाऱ्या म्हाडाच्या दोन जुन्या इमारती कोसळल्या आहेत. या दोन्हीही इमारती 4 मजली होत्या. बुधवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. म्हाडाच्या या दोन्ही इमारती 20 ते 25 वर्ष जुन्या असल्याची माहिती मिळते आहे. इमारत धोकादायक असल्याने आधीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेत कोणतीही जिवीत तसंच वित्त हानी झालेली नाही. 
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. 

Web Title: Two old buildings in MHADA collapsed in Thane