गावदेवी मंदिराची दानपेटी चोरणारे दोन अल्पवयीन मुले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST2021-05-01T04:38:19+5:302021-05-01T04:38:19+5:30

ठाणे: मासुंदा तलावासमोर असलेल्या गावदेवी मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या १५ आणि १६ वयोगटातील दोन मुलांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली ...

Two minors arrested for stealing Gavdevi temple donation box | गावदेवी मंदिराची दानपेटी चोरणारे दोन अल्पवयीन मुले जेरबंद

गावदेवी मंदिराची दानपेटी चोरणारे दोन अल्पवयीन मुले जेरबंद

ठाणे: मासुंदा तलावासमोर असलेल्या गावदेवी मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या १५ आणि १६ वयोगटातील दोन मुलांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडीच्या बालन्यायालयाने दिले आहेत.

या गावदेवी मंदिरातील दानपेटीच्या चोरीबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात एक आठवड्यापूर्वी तक्रार दाखल झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या दोन अल्पवयीन मुलांची धरपकड २७ एप्रिल रोजी केली. त्यांनी या चोरीची कबुलीही दिली. दरम्यान, भिवंडी येथील बाल न्यायालयात त्यांना हजर केले असता, दोघांनाही बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून आणखीही चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Two minors arrested for stealing Gavdevi temple donation box