शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कारखाने बंद पडल्यास दोन लाख कामगार बेरोजगार; प्रदूषणामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्योजक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 06:33 IST

अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली परिसरांत सुमारे ६०० कंपन्या आहेत.

- अनिकेत घमंडी डोंबिवली : प्रदूषणाच्या समस्येवरून एमआयडीसीतील कारखान्यांना टाळे ठोकण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिलेल्या इशाऱ्यावरुन डोंबिवलीएमआयडीसी परिसरातील कारखानदारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कारखाने बंद झाल्यास सुमारे दोन लाख कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळेल. त्यांची जबाबदारी शासन घेणार का, असा सवाल कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केला आहे.

सोनी म्हणाले की, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली परिसरांत सुमारे ६०० कंपन्या आहेत. त्यामध्ये बहुतांश डाइंग कंपन्या आहेत. वस्त्रोद्योग, औषध निर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्याही याठिकाणी आहेत. या औद्योगिक पट्ट्यातून वर्षाला ३५ हजार कोटींची उलाढाल होत असून, येथील ६० टक्के उत्पादनांची निर्यात केली जाते. हे नुकसान कोण सहन करणार? त्यामुळे कंपन्या बंद करणे हा पर्याय नसून प्रदूषण होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

एमआयडीसीतील अनेक कारखानदारांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्याचे काय झाले? या समस्या न सोडवताच ड्रेनेजवाहिनी फुटून रस्त्यावर रासायनिक सांडपाणी आल्याने टोकाचा इशारा देणे गरजेचे होते का? अशी चर्चा कंपनीमालक, कामगारांमध्ये सुरू आहे.

...तर गंभीर परिणाम होतील! 

कारखाने बंद झाल्यास कामगार बेरोजगार होतीलच, पण अन्य घटकांनाही त्याचा फटका बसेल. एमआयडीसी, कल्याण-डोंबिवली महापालिका, महावितरणसाठी येथील कारखान्यांतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. तसेच, कंपन्यांवर अवलंबून असलेले लघुउद्योग, बँकाही अडचणीत येतील. त्याचे परिणाम गंभीर आणि दूरगामी असतील, अशी भीती सोनी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMIDCएमआयडीसीenvironmentपर्यावरणdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीthaneठाणे