शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याचे ठाण्यातून खंडणीसाठी अपहरण करणारे दोघे कल्याणमधून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:59 IST

कर्ज वेळेत न दिल्याने वित्तीय कंपनीच्या कर्मचा-याचे अपहरण २१ हजारांच्या खंडणीसाठी धमकावणा-या दोघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोकड आणि मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या नौपाडा पोलिसांची कारवाईकर्ज वेळेत न दिल्याच्या रागातून अपहरणदोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे : मुदतीमध्ये कर्ज न दिल्याचा राग आल्याने नायगाव येथील एमएम फायनान्स कंपनीतील अश्विन रघुवीर शेट्टी (२३,नालासोपारा) या कर्मचा-याचे अपहरण करून त्याला २१ हजारांच्या खंडणीसाठी धमकावणा-या मोहम्मद नंबरदार आणि तौशिक शेख या दोघांना रविवारी सकाळी नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.अश्विन हे ‘एमएम फायनान्स कन्सल्टन्सी’ या कंपनीत कर्ज प्रस्तावाचे कागदपत्र स्वीकारून ते कंपनीत जमा करण्याचे काम करतात. नंबरदार आणि तौशिक या दोघांनी अश्विन यांच्या एमएम फायनान्स कन्सल्टन्सी मध्ये ११५० रुपये देऊन कर्जासाठी नोंद केली. परंतु, त्यांनी कागदपत्रेच न दिल्याने त्यांच्या कर्जाचा प्रस्ताव अश्विन यांनी बँकेकडे पाठविलाच नव्हता. तो न गेल्यामुळे या दोघांनाही मुदतीमध्ये कर्ज मिळालेच नाही. याच गोष्टीचा राग आल्याने या दोघांनीही त्यांना बोगस ग्राहकाच्या नावाने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फोन करून कर्ज प्रकरणाची कागदपत्रे ठाण्याच्या अलोक हॉटेल येथून घेऊन जाण्यासाठी बोलविले. या फोनप्रमाणे ते तिथे आल्यानंतर मात्र मोहम्मद आणि तौशिक या दोघांनीही त्यांना मारहाण करून एका कारमध्येकोंबून कल्याण येथे अपहरण करून नेले. कल्याणच्या ‘अपूर्वा आमंत्रा टाटा हाऊस’ मधील कार पार्किंगच्या जागेवर त्यांना डांबून त्यांच्या खिशातला १४ हजारांचा मोबाईल, १८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने खेचून घेतली. त्यानंतर त्यांची मालकीण ममता मलिक हिलाही त्यांनी धमकी दिली. अश्विन आमच्या ताब्यात असून आम्हाला २१ हजार रुपये आणून द्या, नाही तर त्याला आम्ही तोडू, अशी खंडणीची धमकीच त्यांनी तिला दिली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अश्विन यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तौशिकसह दोघांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, उपनिरीक्षक अजय गंगावणे यांच्या पथकाने अटक केली.

टॅग्स :thaneठाणेKidnappingअपहरणCrimeगुन्हा