अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या मुंबईतील घरी चोरी करणारे चोरटे ठाण्यातून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 08:49 PM2018-02-21T20:49:01+5:302018-02-21T21:00:52+5:30

घरगडी म्हणून आधी काम करायचे. नंतर त्याच घरात चोरी करणा-या पिंटू आणि त्रिवेणी निशाद या चोरटयांना ठाणे पोलिसांनी जेरबंद केले. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या जूहू येथील घरीही त्यांनी चोरी करुन पलायन केले होते.

Two robbers arrested who theft at actress Bhaghyashree Patvardhan's house in Mumbai | अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या मुंबईतील घरी चोरी करणारे चोरटे ठाण्यातून जेरबंद

चार वर्षांपूर्वी चोरी करुन झाले होते पसार

googlenewsNext
ठळक मुद्देचार वर्षांपूर्वी चोरी करुन झाले होते पसारठाण्याच्या वर्तकनगरमधील चोरीही उघड६२ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत

ठाणे : सिनेअभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या मुंबईतील जुहू येथील घरात शिरून चार वर्षांपूर्वी २६ लाखांची लुट करून पळालेल्यांपैकी पिंटू निशाद (२६, रा. चिंचवड, पुणे) आणि त्रिवेणी उर्फ महेश निशाद (३३, रा. लिंक रोड, मुंबई) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ठाण्यातील एका चोरीतील ६२ हजारांचे सोन्याचे दागिनेही हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे यांनी दिली.
ठाण्याच्या वसंत विहार सर्कल परिसरात घरफोडी करणारे चोरटे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांना मिळाली होती. तिच्या आधारे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली रणावरे यांच्यासह उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार, जमादार बाबू चव्हाण, हवालदार विजय गो-हे, सुनिल सोननिस आणि दिलीप तडवी आदींच्या पथकाने पिंटू आणि त्रिवेणी या दोघांना वसंत विहार भागातून १७ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांच्याकडून १२ इंच लांबीची कटावणी आणि १३ इंचाचा स्क्रू ड्रायव्हर हस्तगत केला. त्यांच्याकडे सखोल चौकशीमध्ये त्यांनी लोकमान्यनगरपाडा क्रमांक तीन येथील पांडे चाळीतील देवीदास काळे यांच्याकडे ४ आॅक्टोंबर २०१७ मध्ये केलेल्या एका चोरीचीही त्यांनी कबुली दिली. यात त्यांनी तीन तोळे सोन्याचा ऐवज चोरला होता. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीची तक्रार दाखल झाली होती. याच चोरीतील ६२ हजारांचे सोन्याचे दागिनेही त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत.
घरगडी म्हणून काम आणि नंतर चोरी
प्रतिष्ठीत किंवा श्रीमंतांच्या घरांमध्ये आधी घरगडी म्हणून काम करायचे. तिथे संपूर्ण टेहाळणी करुन कालांतराने तिथे चोरी करायची, अशी पिंटू निशाद आणि त्याच्या साथीदारांची चोरीची पद्धत होती. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या जूहू येथील घरीही त्यांनी आधी स्वयंपाकी म्हणून काम केले. नंतर त्यांच्याही घरात २४ जानेवारी २०१४ रोजी शिरकाव केला होता. त्यावेळी भाग्यश्री यांच्या घरातील जेवणामध्ये गुंगीकारक औषधांचा वापर करून त्यांचे सासू-सासरे यांना ठार मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या घरातून २४ लाखांचा ऐवज त्यांनी लुटला होता. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह जबरी चोरीचाही गुन्हा दाखल झाला होता. मुंबई पोलिसांनी त्यावेळी यातील दोघांना अटक केली होती. तर पिंटू आणि त्रिवेणी हे त्यातील दोघे मात्र पसार झाले होते. या दोघांनाही आता ठाणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांना २१ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Two robbers arrested who theft at actress Bhaghyashree Patvardhan's house in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.