शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
4
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
5
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
8
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
9
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
10
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
11
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
12
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
13
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
14
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
15
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
16
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
17
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
18
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
19
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
20
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा दोन लाख कुटुंबांना फटका; रेशनकार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची यंत्रे जमा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:55 IST

रेशन मिळणे बंद झाल्याचा रोष रेशन दुकानदारांवर निघू लागल्याने या निर्णयाविरोधात रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे.

ठाणे : शिधापत्रिका आधारकार्डांशी संलग्न करण्याच्या सरकारच्या निर्णयाची पूर्णत: अंमलबजावणी झालेली नसल्याने अनेकांना रेशन मिळणे बंद झाल्याचा रोष रेशन दुकानदारांवर निघू लागल्याने या निर्णयाविरोधात रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे.ठाणे, कळवा-मुंब्रा, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीमधील सुमारे दीड हजार दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याचा फटका एक लाख ९१ हजार शिधापत्रिकाधारकांना बसला आहे. यामध्ये केशरी कार्डधारकांची संख्या लक्षणीय म्हणजे ८० हजारांच्या घरात आहे.दुकाने बेमुदत बंद करण्याचा व गुरुवारी दुपारी १२ वाजता मुख्य रेशनिंग कार्यालयात रेशनकार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्याचे यंत्र जमा करण्याचा निर्णय रेशनिंग दुकानदारांनी घेतला आहे.शिधावाटपाची प्रक्रि या बायोमेट्रीक करण्यात आली. नागरिकांची शिधापत्रिका ही आधारकार्डांशी संलग्न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रेशनव्यवस्थेमधील भ्रष्टाचार दूर करण्याकरिता सरकारने हे निर्णय घेतले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी वृद्ध नागरिक कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्या अंगठ्यांचे ठसे या बायोमेट्रीक प्रणालीमध्ये वार्धक्यामुळे जुळत नसल्याने गोरगरिबांना धान्य देण्यात अडचणी येत आहेत. दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांकडून कागदपत्रे घेऊन ती शासनदरबारी जमा केल्यानंतरही चुकीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.चुकीचा डाटा जमा केल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच, या बायोमेट्रीक पद्धतीमुळे कुटुंबातील अनेक सदस्यांना धान्य घेण्यासाठी दुकानात जावे लागत आहे. गेली पाच वर्षे आधार संलग्नतेची प्रक्रि या सुुरू असूनही त्यामध्ये सुधारणा न झाल्यानेच हा बंद पुकारण्यात आला असल्याचे ठाणे जिल्हा रेशनिंग दुकानदार कृती समितीने सांगितले.या बंदमध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर आदी भागांतील सुमारे १४७३ दुकानदार सहभागी झाले आहेत, असेही समितीने स्पष्ट केले आहे. सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रक्रि या सुधारण्यासाठी दोन बैठका घेण्यात आल्या. मात्र, तोडगा न निघाल्याने आंदोलन केल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.दरम्यान, बुधवारी राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीला राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील तसेच रेशनिंग दुकानदार उपस्थित होते. या बैठकीत शासनाला जाग येण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता रेशनकार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्याच्या मशीन मुख्य रेशनिंग कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत या मशीनमधील त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत बंद कायम राहील, असा इशारा दिला जाईल.बंदच्या काळात धान्य नाहीया बंदचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसणारअसून जवळपास एक लाख ९१ हजार कुटुंबांनाबंदच्या काळात धान्य मिळणार नाही. ठाणे जिल्ह्यातील पिवळ्या रेशनकार्डधारक बीपीएल आणि अंत्योदय अशा दोन योजनांच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे.बीपीएलअंतर्गत ५६ हजार ४९३, तर अंत्योदय योजनेंतर्गत ४७ हजार ५१ रेशनकार्डधारक येतात. केशरी रेशनकार्ड असलेले ८० हजार ४९०, तर शुभ्र रेशनकार्ड असलेले सात हजार ८२ रेशनकार्डधारक आहेत.मेस्मा, मकोका लावण्याच्या धमक्यारेशनिंग दुकानदारांचा बंद मोडीत काढण्यासाठी समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर ‘मेस्मां’तर्गत कारवाई करण्याच्या तसेच ‘मकोका’ लावण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याकडे समितीने लक्ष वेधले.कळव्यात दोन दुकाने फोडलीरेशनिंगवर धान्य मिळत नसल्याने आणि आधारकार्ड रेशनिंग कार्डशी लिंक करण्याची मागणी होत असल्याने ते जुळले जात नसल्याने अनेकांना धान्य मिळेनासे झाले आहे. याच रोषातून मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी कळव्यातील दोन दुकाने फोडण्यात आली. एका ठिकाणी तर आधारकार्ड लिंकच्या मशीनची नासधूस करण्यात आली.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड