ठाण्यात दोन विविध अपघातांत दोघेजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 04:19 IST2019-03-07T04:19:03+5:302019-03-07T04:19:06+5:30
घोडबंदर रोडवरील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका ६१ वर्षीय पादचाऱ्याचा समावेश असून दोन्ही प्रकरणांमध्ये मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले.

ठाण्यात दोन विविध अपघातांत दोघेजण जखमी
ठाणे : घोडबंदर रोडवरील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका ६१ वर्षीय पादचाऱ्याचा समावेश असून दोन्ही प्रकरणांमध्ये मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले.
मनोरमानगर येथे राहणाऱ्या पुष्पा शर्मा (३८) या ४ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त ढोकाळी नंदीबाबा मंदिर येथे जत्रा पाहण्यासाठी मुलीला घेऊन दुचाकीने गेल्या होत्या. रात्री ८.३० वाजता घरी परत जाताना भरधाव कारने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली असून फरार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसºया घटनेत कळवा, खारेगाव येथे राहणारे मोहन गुंजाळ (६१) हे जखमी झाले आहेत.