टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वारासह दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST2021-03-10T04:40:19+5:302021-03-10T04:40:19+5:30

ठाणे : टेम्पोच्या धडकेत शिवाजी पाटील (५५, वर्तकनगर, ठाणे) या मोटारसायकलस्वारासह दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...

Two injured, including a motorcyclist, in a Tempo collision | टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वारासह दोघे जखमी

टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वारासह दोघे जखमी

ठाणे : टेम्पोच्या धडकेत शिवाजी पाटील (५५, वर्तकनगर, ठाणे) या मोटारसायकलस्वारासह दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवाजी पाटील आणि त्यांचा मित्र इंगळे हे वागळे इस्टेट येथील हिंदू फोर्जिंग कंपनीजवळील रस्त्याने ८ मार्च रोजी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास जात होते. त्याचवेळी रोड क्रमांक २५ येथून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. यामध्ये शिवाजी आणि त्यांचा मित्र इंगळे हे दोघेही खाली पडले. यात शिवाजी यांच्या डाव्या पायाला, डाव्या हाताला मार लागला, तसेच पायाचे आणि हाताचे हाड फ्रॅक्चर झाले, तर इंगळे यांच्या उजव्या पायाला किरकोळ मार लागला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. डी. तोरडमल अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two injured, including a motorcyclist, in a Tempo collision