उल्हासनगरात मिरवणूकीच्या दरम्यान हाणामारीच्या दोन घटना, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: April 15, 2023 15:55 IST2023-04-15T15:54:25+5:302023-04-15T15:55:55+5:30
उल्हासनगर व हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरात मिरवणूकीच्या दरम्यान हाणामारीच्या दोन घटना, गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरातील विविध विभागात मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. यादरम्यान दोन हाणामारीच्या दोन घटना घडल्या असून उल्हासनगर व हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ मुकुंदनगर परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुक संपल्यानंतर शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता अनिल इंगळे हे घरा समोर मित्र प्रशांत निकम यांच्या सोबत बोलत होते. त्यावेळी तेथे आलेल्या अमोल मोरे, गौतम मोरे, दीपक जाधव व सिद्धार्थ मोरे यांनी जुन्या भांडणाच्या रागातून डॉ आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत धक्का का मारला?. याचा जाब अनिल इंगळे याला विचारात मारहाण केली. याप्रकरणी इंगळे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीसांनी चौघा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत कॅम्प नं-४ येथील काली माता मंदिर चौकात किशोर आहुजा हे शुक्रवारी साडे अकरा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढलेली जयंती बघत होते. त्यावेळी आपसात भांडत असलेले साहिल, जय व गोपाळ यांना क्या हो गया? असे विचारले. जय, साहिल व गोपाळ यांना आहुजा याने जाब विचारल्याचा राग येऊन मारहाण केली. तसेच डोक्यावर चाकूने वार केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात जय, साहिल व गोपाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"