कळव्यात एकाच दिवशी दोन घरफोड्या
By Admin | Updated: October 24, 2015 23:27 IST2015-10-24T23:27:41+5:302015-10-24T23:27:41+5:30
एकाच दिवशी चोरट्यांनी दोन घरे फोडल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळव्यात एकाच दिवशी दोन घरफोड्या
ठाणे : एकाच दिवशी चोरट्यांनी
दोन घरे फोडल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी पाटबंधारे विभागाच्या स्टोअर रूमला टार्गेट केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कळवा, सूर्यनगर येथील लोकेश राठोड यांच्या घराच्या खिडकीवाटे चोरट्यांनी प्रवेश केला. त्या वेळी त्यांनी घरातील सोन्याचे झुमके, मोबाइल आणि रोख १३ हजार असा १६ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही चोरी कौशिक पाटणकर आणि त्याच्या दोन मित्रांनी केल्याचा संशय राठोड यांनी केल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
याप्रकरणी कोणालाही अटक केली नाही. दुसऱ्या घटनेत, कळव्यातील पाटबंधारे विभागाच्या स्टोअर रूमचे कुलूप फोडून चोरट्यांनी जनरेटर घेऊन पोबारा केला आहे. त्याची किंमत दोन हजार रुपये असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. दोन्ही घटनांप्रकरणी शुक्रवारी गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)