उल्हासनगरमध्ये दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: January 15, 2017 05:01 IST2017-01-15T05:01:31+5:302017-01-15T05:01:31+5:30

शहरातील गोलमैदान परिसरातील साधू वासवानी पुतळ्यासमोर दोन गटांत शुक्रवारी हाणामारी झाली. यामध्ये भाजपा नगरसेविका मीनाकौर लबाना यांचा मुलगा गुरुपीत उर्फ

Two groups clash in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये दोन गटांत हाणामारी

उल्हासनगरमध्ये दोन गटांत हाणामारी

उल्हासनगर : शहरातील गोलमैदान परिसरातील साधू वासवानी पुतळ्यासमोर दोन गटांत शुक्रवारी हाणामारी झाली. यामध्ये भाजपा नगरसेविका मीनाकौर लबाना यांचा मुलगा गुरुपीत उर्फ बॉक्सर व दुसऱ्या गटातील अज्जू नावाचा तरुण जखमी झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दोन्ही गटांतील समर्थकांनी पोलीस ठाण्यासह गोलमैदान परिसरात धाव घेतल्याने पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ३, गोलमैदान येथून रात्री ९ वाजता गुरुपीत दुचाकीवरून जात होता. त्या वेळी अज्जू नावाच्या तरुणासह १५ ते २० तरुणांनी गुरुपीतला अडवून पोटाजवळ पिस्तूल रोखले. गळ्यातील १५ तोळे सोन्याची चेन व १० हजार रुपये काढून चॉपर व तलवारीने वार केल्याचे तक्रारीत गुरुपीतने म्हटले आहे. दुसऱ्या गटातील सैफ मासूम सय्यद यानेही गुरुपीत व साथीदाराविरोधात तक्रार दाखल केली. रात्री साडेदहाच्या सुमारास गोलमैदान येथून दुचाकीवरून अज्जू जात असताना गुरुपीत व त्याच्या ५ साथीदारांनी अडवले आणि चाकूने वार करीत सोनसाखळी व १० हजार हिसकावून घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Two groups clash in Ulhasnagar