शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली अखेर सापडल्या; पोलिसांसह शिक्षकांची उडाली तारांबळ 

By जितेंद्र कालेकर | Updated: September 26, 2022 18:57 IST

ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली सापडल्या आहेत. 

ठाणे: सोमवारी सकाळी ठाण्यातील एका शाळेतील नववीतील दोन विद्यार्थीनी शाळेत जाण्याऐवजी मुलूंडच्या उद्यानामध्ये गेल्यामुळे शिक्षकांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा सुटण्याच्या वेळेत फेरफटका मारुन या मुली पुन्हा शाळेतच परतल्यामुळे पालकांसह श्रीनगर पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. ठाण्यातील वागळे इस्टेट शिवाजीनगर भागातील संकल्प स्कूलमधील इयत्ता नववीतील दोन १४ वर्षीय विद्यार्थीनी शाळेबाहेरुनच बेपत्ता झाल्याची माहिती याच शाळेच्या एका विद्यार्थीनीने शिक्षकांना दिली. 

घटनेची माहिती मिळताच या मुलींची त्यांच्या घरीही सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून शोधाशोध सुरु झाली. त्या घरी देखील नसल्यामुळे पालकांसह शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्याकडून याबाबत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. तोपर्यंत एका मुलीकडून माहिती मिळाली की, रविवारीच तीन मुलींनी मुलूंडच्या उद्यानात फिरायला जाण्याची योजना बनविली होती. तिसऱ्या मुलीला तिची आई शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडण्यासाठी गेल्यामुळे ती या दोन मुलींसोबत जाऊ शकली नव्हती. 

पोलिसांसह शिक्षकांची उडाली तारांबळ सोशल मिडियावरुन या दोन मुली बेपत्ता झाल्याची वार्ता शहरभर पसरली. तोपर्यंत ठरलेल्या योजनेनुसार शाळा सुटण्याच्या वेळेत कथित बेपत्ता झालेल्या मुली पुन्हा शाळेकडे परतल्या. तोपर्यंत श्रीनगर पोलिसांकडून या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हाही दाखल झाला नव्हता. परंतु, आपल्या मुली सुखरुप घरी परतल्याचे पाहून पालक आणि शिक्षकांनीही सुटकेचा श्वास घेतला. 

पालकांनी आपल्या मुलांशी मैत्री करीत त्यांच्याशी संवाद वाढविला पाहिजे. अनेकवेळा आई आणि वडिलही नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुले एकाकी पडतात. त्यांनाही बाहेर फिरावेसे वाटते. त्यामुळे कधीतरी त्यांनाही फिरायला न्यावे. परंतू, मुले आणि मुलींनीही पालक आणि शिक्षकांच्या परवानगी विना घर आणि शाळा सोडणेही चुकीचे आहे. त्यामुळे एखादी दुर्घटनाही घडण्याची शक्यता असते. असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी म्हटले. 

 

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाPoliceपोलिस