शिकस्त इमारतीचे दोन मजले उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:46 IST2017-08-01T02:46:25+5:302017-08-01T02:46:25+5:30

कल्याण फाट्यावरील एका शिकस्त इमारतीचे दोन मजले महापालिकेने सोमवारी उद्ध्वस्त केले.

The two floors of the beaten building collapsed | शिकस्त इमारतीचे दोन मजले उदध्वस्त

शिकस्त इमारतीचे दोन मजले उदध्वस्त

ठाणे : कल्याण फाट्यावरील एका शिकस्त इमारतीचे दोन मजले महापालिकेने सोमवारी उद्ध्वस्त केले. तत्पूर्वी, या इमारतीतील कुटुंबांना अन्यत्र स्थानांतरित केले आहे.
कल्याण फाट्यावरील जयंती टॉवर ही चार मजली इमारत शिकस्त झाल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकाºयांनी इमारतीची पाहणी केली असता इमारतीचे दोन मजले धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, हे दोन्ही मजले उद्ध्वस्त करण्यास सोमवारी सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी इमारतीतील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
इमारतीच्या छतावर जवळपास २ टन स्टील आणि अन्य साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. हे साहित्य जप्त केले असल्याची माहिती महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. कारवाईसाठी अग्निशमन दलासह इतर यंत्रणाही घटनास्थळी सज्ज होत्या.

Web Title: The two floors of the beaten building collapsed