हद्दपार झालेल्या दोन गुंडाला तलवारीसह अटक; मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: March 25, 2024 16:56 IST2024-03-25T16:56:07+5:302024-03-25T16:56:42+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात राहणारा कृष्णा उर्फ कैलास कालिदास कमोडिया याला दोन वर्षासाठी ठाणे, बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे व रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते.

हद्दपार झालेल्या दोन गुंडाला तलवारीसह अटक; मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगर व मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार केलेल्या दोन गुंडाला पोलिसांनी शनिवारी रात्री तलवारीसह अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात राहणारा कृष्णा उर्फ कैलास कालिदास कमोडिया याला दोन वर्षासाठी ठाणे, बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे व रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते. शनिवारी रात्री १० वाजता एका पडक्या इमारती पासून त्याला तलवारीसह उल्हासनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत खेमानी परिसरात राहणारा रोहित उर्फ काण्या आनंद गायकवाड याला बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता रमाबाई आंबेडकरनगर येथून त्याला तलवारीसह पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.