लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तीन हात नाका येथे रिक्षातील तरुणीचा मोबाईल हिसकावतांना मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच कळवा येथेही रिक्षातून जाणाऱ्या एका ४० वर्षीय गृहिणीचा मोबाईल दोघांनी हिसकावून पलायन केल्याची घटना खारेगाव येथे नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे.खारेगाव येथे मुंबई नाशिक मार्गावरुन ही विवाहिता ९ जून २०२१ रोजी रिक्षाने जात होती. त्याचवेळी एका मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या भामटयाने चालत्या रिक्षामध्ये हात टाकून या महिलेच्या हातातील ९० हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात १४ जून रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
रिक्षातील विवाहितेचा मोबाईल हिसकावून दोघांचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 18:59 IST
कळवा येथे रिक्षातून जाणाऱ्या एका ४० वर्षीय गृहिणीचा मोबाईल दोघांनी हिसकावून पलायन केल्याची घटना खारेगाव येथे नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे.
रिक्षातील विवाहितेचा मोबाईल हिसकावून दोघांचे पलायन
ठळक मुद्दे खारेगाव येथील घटना कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा